'या' आठ शेअर्समध्ये गुंतवणूक करा, नक्कीच फायदा मिळेल

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांची इच्छा असते. काही जण इतरांनी गुंतवणूक केलीय म्हणून या पर्यायाकडे वळतो, तर काही जलद फायदा मिळेल या हव्यासापोटी ही गुंतवणूक करतो. पण तुम्ही जर योग्य पद्धतीने ही गुंतवणूक केली नाही, तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल, तर या 8 …

'या' आठ शेअर्समध्ये गुंतवणूक करा, नक्कीच फायदा मिळेल

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांची इच्छा असते. काही जण इतरांनी गुंतवणूक केलीय म्हणून या पर्यायाकडे वळतो, तर काही जलद फायदा मिळेल या हव्यासापोटी ही गुंतवणूक करतो. पण तुम्ही जर योग्य पद्धतीने ही गुंतवणूक केली नाही, तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल, तर या 8 शेअरमध्ये गुंतवणूक करा. या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास येत्या 2-3 आठवड्यात नक्कीच तुम्हाला फायदा मिळू शकतो.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी 8 शेअर 

1. एचसीए (HCL) टेक्नोलॉजी :

एचसीएल टेक्नोलॉजी हा शेअर दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी चांगला आहे. याची टार्गेट किंमत (target price) 1 हजार 270 रुपये आहे. तर स्टॉप लॉस (stop loss) 1 हजार 90 रुपये आहे.

2. जिंदल स्टिल अँड पावर :

जिंदल स्टिल अँड पॉवर या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. या शेअरची टार्गेट किंमत 190 रुपये आहे. तर याचा स्टॉप लॉस 167 रुपये आहे.

3. स्टेट बँक ऑफ इंडिया :

एसबीआय बँकेचे शेअर नेहमीच फायदेशीर ठरतो. या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही. या शेअरची टार्गेट किंमत 340-360 मध्ये आहे. तर स्टॉप लॉस 297 रुपये आहे.

4. अंबुजा सिमेंट : 

पैशाची गुंतवणूक करण्यासाठी अंबुजा सिमेंट हा चांगला पर्याय आहे. आर्थिकदृष्ट्या अतिशय विश्वसनीय हा शेअर आहे. याची टार्गेट किंमत 240 रुपये असून स्टॉप लॉस 219 रुपये आहे.

5. हेक्सावेअर टेक्नोलॉजी :

या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. याची टार्गेट किंमत 390 रुपये असून स्टॉप लॉस 332 रुपये आहे.

6. मल्टी कमोडिटी एक्सचेंज : 

गेल्या तीन महिन्यांपासून या शेअरची किंमत नेहमीच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यात गुंतवणूक केल्याच तुम्हाला कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. या शेअरची टार्गेट किंमत 925 रपये आहे. तर स्टॉप लॉस 790 रुपये आहे.

7. डॉ रेड्डीज लॅबरेटरीज : 

गेल्या आठवड्यात या शेअरने चांगलीच कामगिरी केली होती. सध्या हा शेअर मार्केटमध्ये ट्रेंडीग आहे. त्यामुळे टार्गेट किंमत 3 हजार 100 रुपये आहे, तर स्टॉप लॉस किंमत 2 हजार 775 रुपये आहे.

8. शंकरा बिल्डींग प्रॉडक्ट

सध्या हा शेअर मार्केटमध्ये चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. या शेअरची टार्गेट किंमत 595 – 620 रुपये आहे. तर स्टॉप लॉस 485 रुपये आहे.

  • कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्या
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *