Indigo Flight chaos : तुमचीही इंडिगोची फ्लाईट झाली रद्द ? रिफंड कसा मिळवाल ? हे नक्की वाचा

इंडिगोच्या विमान कंपनीमध्ये सुरू असलेल्या समस्यांमुळे अनेक प्रवाशांचा प्रवास विस्कळीत झाला आहे. अचानक फ्लाईट रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. अशा परिस्थितीत जर तुमचीही फ्लाईट रद्द झालीय तर तुम्ही या सोप्या पद्धतीने रद्द झालेल्या तिकिटाचे रिफंड मिळवू शकता. चला याबद्दल जाणून घेऊयात.

Indigo Flight chaos : तुमचीही इंडिगोची फ्लाईट झाली रद्द ? रिफंड कसा मिळवाल ? हे नक्की वाचा
इंडिगो विमानसेवेमुळे गोंधळ
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: Dec 06, 2025 | 2:19 PM

इंडिगो एअरलाईनच्या (Indigo Airlines) विमानांमध्ये सुरू असलेल्या व्यत्ययांमुळे हजारो प्रवाशांना त्याचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे समस्या देखील वाढल्या आहेत. लोकांना विमानतळावर तासंतास त्यांचा फ्लाईटची वाट पाहावी लागत आहे. तर अचानक फ्लाईट रद्द होणे आणि तिकिटाचे वाढते दर यांचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की दिल्ली विमानतळाने शुक्रवारपर्यंत इंडिगोच्या अनेक सेवा स्थगित केल्या आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर तुमची विमानसेवा रद्द झाली तर तुम्ही काढलेल्या तिकिटाचा परतावा म्हणजेच रिफंड कसा मिळवता येईल ? आजच्या लेखात स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

इंडिगो प्रवाशांना अडचणी का ?

गेल्या काही दिवसांपासून नवीन फ्लाईट ड्युटी वेळेच्या नियमांमुळे इंडिगोच्या विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक मार्गांवर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे फ्लाईट वेळेवर सुरू होऊ शकली नाहीत. ज्यामुळे फ्लाईट सतत रद्द होण्याचे सत्र सुरू झाले आहे. दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या प्रमुख विमानतळांवर यांचा गोंधळ निर्माण झाला आणि अचानक तिकिटाचे भाडेही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे.

या सर्व समस्यामुळे अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यात प्रवाशांच्या विरोध पाहून इंडिगोने 5 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यानच्या प्रवासासाठीच्या सर्व रीशेड्युलिंग आणि रद्द करण्याच्या विनंत्यांवर पूर्ण रिफंड करण्याची घोषणा केली आहे.

तुम्हाला पूर्ण रिफंड कधी मिळू शकेल?

डीजीसीएचे नियमानुसार जर एखाद्या विमान कंपनीने स्वतःच्या चुकीमुळे फ्लाईट रद्द केली किंवा वेळेवर फ्लाईट उड्डाण केले नाही तर प्रवाशाला 100% रिफंड मिळाला पाहिजे. त्यात नॉन-रिफंडेबल तिकिट असले तरी या समस्यामुळे प्रवाशाला कर आणि एअरपोर्ट शुल्क परत मिळते. शिवाय प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पुढील उपलब्ध विमानाचे पुन्हा बुकिंग करू शकतो.

रिफंड कसा मिळवायचा – स्टेप बाय स्टेप घ्या जाणून

प्रथम तुमच्या फ्लाइटचे स्टेटस चेक करा: IndiGo वेबसाइट किंवा अॅपवर Manage Booking सेक्शन उघडा. फ्लाइट खरोखर रद्द झाली आहे का ते पाहण्यासाठी तुमचा पीएनआर आणि आडनाव प्रविष्ट करा.

तुम्हाला रिफंड हवे आहे की पुन्हा बुकिंग करायची आहे ते ठरवा: तुमच्याकडे दोन पर्याय आहेत ज्यामध्ये तुम्ही पूर्ण रिफंड आणि पुढील उपलब्ध फ्लाइटवर मोफत बुकिंग करणे. जर तुमची ट्रिप गरजेची नसेल तर रिफंड निवडणे योग्य ठरेल.

ऑनलाइन परतफेड विनंती सबमिट करा: रद्द झालेल्या फ्लाइटसाठी Refund for Cancelled Flight रिफंड पर्यायामध्ये पीएनआर आणि प्रवाशांची माहिती प्रविष्ट करा आणि विनंती सबमिट करा. जर तुम्ही ऑनलाइन पैसे दिले असतील, तर रिफंड 57 दिवसांच्या आत त्याच कार्ड/यूपीआय/वॉलेटमध्ये जमा होईल. जर तुम्ही कॅश पेमेंट केले असेल तर त्याच विमानतळ काउंटरवर जा आणि तुमच्या ओळखपत्रासह दावा करा. एजंट किंवा थर्ड-पार्टी बुकिंग परतफेड प्रक्रिया करतील.

अडकलेल्या प्रवाशांसाठी इंडिगोकडून कोणती व्यवस्था ?

वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने जाहीर माफी मागितली आहे आणि त्यासोबत प्रवाशांसाठी काही मदत उपाय लागू केले आहेत. त्यांनी सर्व रद्दीकरण किंवा रीशेड्यूल शुल्क माफ केले आहे. ऑटोमॅटिक रिफंडद्वारे पेमेंट परत केले जाईल. अडकलेल्या प्रवाशांसाठी हजारो हॉटेल खोल्या, वाहतूक आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळांवर अतिरिक्त सहाय्यक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.