
जगभरात एकापेक्षा एक असे अनेक यशस्वी उद्योजक आहेत. ज्यांनी शून्यातून सुरूवात करून यशाचं शिखर गाठलं. याच पठडीत एक असं नाव आहे, ज्यांनी आपलं घर चालण्यासाठी शाळा सोडली. डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला सुरूवात केली. पण, त्याच डिलिव्हरी बॉयने आपल्या मेहनतीच्या, कर्तुत्वाच्या बळावर यशाची एकेक पायरी चढली. यशस्वी उद्योजक झाला. करोडो रुपयांची त्याची मालमत्ता जमली. इतकंच नाही तर त्या उद्योजकाने जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत आपले नाव नोंदवले. हा यशस्वी उद्योजक दुसरे तिसरे कोणी नाही तर झारा कंपनीचे मालक अमानसियो ऑर्टेगा आहे. जगातील मोठी फॅशन ब्रँड कंपनी ‘Zara’ झारा ही जगातील एक मोठी फॅशन ब्रँड कंपनी आहे. कंपनीचे मालक अमानसियो ऑर्टेगा यांनी अर्ध्यातून शाळा सोडली होती. एक डिलिव्हरी बॉय म्हणून त्यांनी काम केलं होतं. कधी काळी डिलिव्हरी बॉय असलेल्या अमानसियो ऑर्टेगा यांच्याकडे सद्य स्थितीत 1 लाख कर्मचारी आणि 80 देशात 2000 पेक्षा जास्त शॉप्स आहेत....