मोठी बातमी, बँक ऑफ बडोदामध्ये 250 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज
बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 250 पदांसाठी असणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावा. बँकेत काम करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल तर अर्ज करा. ही मोठी बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग करा अर्ज.

मुंबई : तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पदवीधरांसाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून अगदी आरामात अर्ज करू शकता. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही पदवीधरांसाठी नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतो. अर्ज हा आॅनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेच्या अर्जासाठी आता काही अवघे दिवस शिल्लक आहेत.
ही भरती प्रक्रिया बँक ऑफ बडोदाकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एक बंपर भरतीच म्हणावी लागेल. बँक ऑफ बडोदामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया 250 जागांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी आजच अर्ज हा करावा. या भरती प्रक्रियेसंदर्भात बँक ऑफ बडोदाकडून अधिकृत सूचना देखील जाहिर करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच आपले अर्ज करावेत. ही भरती प्रक्रिया वरिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी होत आहे. तब्बल 250 पदे ही वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून भरली जाणार आहेत. पदवीधरांसाठी ही मोठी संधीच आहे. मग चला तर आजच करा अर्ज आणि मिळवा बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी.
कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतली असेल तरीही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी पात्र आहेत. मात्र, पदवीमध्ये उमेदवाराला 60 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असणे आवश्यक आहे. त्याशिवाय या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज नाही करू शकत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची देखील अट ठेवण्यात आलीये. अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागेल.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय हे कमीत कमी 28 तर जास्तीत जास्त हे 37 असावे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या साईटला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दची सर्व महिती मिळेल. या भरती प्रक्रियेचे सर्व अपडेट तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या साईटवर मिळतील.