AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअरचे अनेक आकर्षक पर्याय! वाचा सविस्तर

फॅशन डिझायनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना काही मूलभूत कौशल्यांची गरज असते. देश-विदेशातील लेटेस्ट फॅशन ट्रेंड्सची माहिती असायला हवी आणि त्यात रस असणंही गरजेचं आहे.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअरचे अनेक आकर्षक पर्याय! वाचा सविस्तर
Career in fashion industryImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 12, 2023 | 4:44 PM
Share

देशातील फॅशन इंडस्ट्री खूप वेगाने पुढे जात आहे. त्यानुसार व्यावसायिकांची मागणीही वाढत आहे. तरुणमंडळी याला करिअर म्हणून अधिकाधिक स्वीकारत आहेत. इथे करिअरच्या अनेक संधी आहेत. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीला जवळजवळ आयटी इंडस्ट्रीचा दर्जा आहे, कारण सर्व बड्या स्टार्सचे स्वतःसाठी वेगवेगळे डिझायनर असतात. आजकाल शूजपासून कपड्यांपर्यंत, साड्यांपासून सूटपर्यंतच्या डिझाइनवर काम केले जात आहे. त्यात करिअर करून तुम्ही लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीही करू शकता. चला जाणून घेऊया फॅशन इंडस्ट्रीत करिअरच्या कोणत्या संधी आहेत, कोर्सेस आणि कॉलेजसह सर्व माहिती.

फॅशन डिझायनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना काही मूलभूत कौशल्यांची गरज असते. देश-विदेशातील लेटेस्ट फॅशन ट्रेंड्सची माहिती असायला हवी आणि त्यात रस असणंही गरजेचं आहे. सर्जनशील आणि कलात्मक विचार, रेखाटन कौशल्य इत्यादींसह संवाद कौशल्य आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकते.

डिप्लोमा किंवा डिग्री कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता. पुढे शिकायचं असेल तर मास्टर्स आणि पीएचडीही करू शकता.

कोणती टॉप कॉलेजेस?

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन
  • इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
  • इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड फॅशन टेक्नॉलॉजी

देशात आजकाल फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअरचे अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. उदा., फॅशन डिझायनर, फॅशन उद्योजक, फॅशन डायरेक्टर, फॅशन जर्नलिस्ट/एंटरप्रेन्योर. लेखक/ समीक्षक, पैटर्न मेकर / फ्लिकर कॉस्ट्यूम डिझायनर, फॅशन फोटोग्राफर, फॅशन कन्सल्टंट/ पर्सनल स्टायलिस्ट, फॅशन शोचे आयोजक इ.

त्यात करिअर करण्यासाठी क्रिएटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. लेटेस्ट फॅशन ट्रेंडनुसार कॉस्ट्यूम डिझाइन करा. थ्री डायमेंशनल स्वरूपात रेखाचित्रे तयार करण्याची समज असावी. यात अनेक नोकऱ्याही आहेत, पार्ट टाइम जॉबचाही पर्याय आहे. ज्यांना फॅशनसोबतच फोटोग्राफीचीही आवड आहे. ही त्यांच्यासाठी करिअरची योग्य निवड आहे.

देशात अनेक टॉप फॅशन डिझायनर्स आहेत. कपडे, चप्पल, दागिने आणि अॅक्सेसरीजचे ओरिजिनल डिझाइन तयार करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. आपण स्वत: चे फॅशन आउटलेट, बुटीक किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून चांगले पैसे कमवू शकता. व्यवसायात जसजसे वय वाढत जाते तसतसे तुमचे उत्पन्नही वाढते.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.