ICAR Recruitment 2021: यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी ICARमध्ये भरती, 20 जुलैपर्यंत करा अर्ज

याशिवाय अर्जदारांनी अर्ज करताना काळजीपूर्वक अधिसूचना वाचली पाहिजे, कारण त्यात काही विसंगती आढळल्यास अर्ज अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

ICAR Recruitment 2021: यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी ICARमध्ये भरती, 20 जुलैपर्यंत करा अर्ज
government job 2021

नवी दिल्लीः ICAR Recruitment 2021: भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) यंग प्रोफेशनल पदे भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. आयसीएआर एकूण 14 पदांची भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करावयाचे आहेत, ते https://icar.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्याच वेळी या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत हे उमेदवारांनी लक्षात ठेवले पाहिजे. याशिवाय अर्जदारांनी अर्ज करताना काळजीपूर्वक अधिसूचना वाचली पाहिजे, कारण त्यात काही विसंगती आढळल्यास अर्ज अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

मान्यता प्राप्त संस्थांकडून किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक

आयसीएआर, बीकॉम किंवा बीबीए किंवा बीबीएस, सीए इंटर किंवा आयसीडब्ल्यूए इंटर किंवा सीएस इंटर यांनी मान्यता दिलेल्या संस्थांकडून किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवाराला किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असावा. त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 45 वर्षे असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार शिथिलता देण्यात येणार आहे.

आयसीएआरकडून भरतीसंदर्भात अधिसूचना जारी

आयसीएआरने भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. तसेच प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर आवश्यक असल्यास शॉर्टलिस्टेड उमेदवारांना पॅनेल इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल. पात्र उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगसाठी लेखी परीक्षा देखील घेतली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईट https://icar.org.in/ वर उपलब्ध अधिसूचना वाचू शकता.

असिस्टंट मॅनेजर ते टेक्निशियनच्या पदांसाठी नोकरी, आजच अर्ज करा…

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडने (Rail India Technical and Economic Service Limited) सहाय्यक व्यवस्थापक आणि तंत्रज्ञांच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. rites.com च्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार एकूण 26 रिक्त पदे भरती करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI