BARC Job : 10वी पास असाल तर भाभा अणु संशोधन केंद्रात काम करण्याची सुवर्णसंधी, आज अर्ज करा…

BARC : वर्क असिस्टंट पदावरील भरतीसाठी वर्क असिस्टंट कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेला असावा. स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण झालेला असावा.

BARC Job : 10वी पास असाल तर भाभा अणु संशोधन केंद्रात काम करण्याची सुवर्णसंधी, आज अर्ज करा...
job
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 12:18 PM

मुंबई : तुमचं जास्त शिक्षण झालं नसेल तरीही घाबरण्याचं कारण नाही. कारण तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्हाला भाभा अणु संशोधन केंद्रात काम करण्याची चांगली संधी मिळू शकते. सध्या भाभा अणु संशोधन केंद्र (Bhabha Atomic Research Center) ने 10वी उत्तीर्ण लोकांना कामाची सुवर्णसंधी दिली आहे. 10वी उत्तीर्ण झालेल्यांना स्टेनोग्राफर, वर्क असिस्टंट आणि ड्रायव्हर या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. या पदांसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हालाही भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरी करायची असेल तर तुम्हाला 31जुलैपूर्वी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. एसी (SC), एसटी आणि महिला उमेदवारांना ऑनलाइन अर्जा करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. स्टेनोग्राफर, वर्क असिस्टंट आणि ड्रायव्हर या पदांसाठी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावं, ही अट आहे.

BARC भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज भरायला 1 जुलै 2022 पासून सुरुवात झाली आहे.
तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.

अर्जासाठी फी किती असेल

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 100 रुपये भरावे लागतील. तर AC/ST/महिला उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

कोणत्या पदांसाठी किती भरती?

एकूण पदांची संख्या- 89

वर्क असिस्टेंट- 72

स्टेनोग्राफर – 06

ड्राइवर – 11

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
BARC भर्ती 2022 च्या नियमांनुसार स्टेनोग्राफर, वर्क असिस्टंट आणि ड्रायव्हर यांना वयात सवलत दिली जाईल.

BARC भरती 2022 साठी पात्रता

वर्क असिस्टंट पदावरील भरतीसाठी वर्क असिस्टंट कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेला असावा. स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण झालेला असावा. याशिवाय इंग्रजी स्टेनोग्राफरचा वेग 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंगचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असावा. तर चालक पदासाठी अर्जदार दहावी उत्तीर्ण असावा. त्‍याच्‍याकडे लहान मोटार वाहन किंवा जड मोटार वाहन चालविण्‍याचा परवाना असावा आणि तसंच त्याच्याकडे 3 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.