Indian Army Jobs: इंडियन आर्मीमध्ये NCC च्या C सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी मोठी संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

भारतामध्ये युवकांना सैन्य दलात भरती होण्याचं आकर्षण मोठ्या प्रमाणावर आहे. नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. Indian Army Recruitment

Indian Army Jobs: इंडियन आर्मीमध्ये NCC च्या  C सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी मोठी संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
Indian army
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jun 16, 2021 | 7:09 PM

Indian Army Jobs नवी दिल्ली: भारतामध्ये युवकांना सैन्य दलात भरती होण्याचं आकर्षण मोठ्या प्रमाणावर आहे. नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महिला आणि पुरुष उमदेवारांना अर्ज करता येणार आहे. एनसीसी प्रमाणपत्र आणि पदवीधारक उमेदवार अर्ज करु शकतात. (Indian Army Recruitment 2021 NCC Entry in Short Service Selection)

16 जूनपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात

इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममध्ये अर्ज करण्यास 16 जूनपासून सुरुवात झाली आहे. अर्ज करणारे उमेदवार इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर म्हणजेच joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अखेरची मुदत 15 जुलै आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी कसलंही शुल्क जमा करावं लागणार नाही. केंद्रीय वेतनश्रेणी स्तर 10 नुसार निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.

पदाचे नाव : एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम 50 वा कोर्स ऑक्टोबर 2021 पदांची संख्या : पुरुष उमेदवार : 50 महिला उमेदवार 05

पात्रता

इंडियन आर्मीमध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांकडे एनसीसी सी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. उमेदवारानं भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 टक्के गुणांसह पदवी मिळवलेली असणं आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत असणारे उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करु शकतात.

वयोमर्यादा

इंडियन आर्मीमध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांचं वय 19 वर्ष ते 25 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. 1 जुलै 2021 ला उमेदवार 19 वर्षांपेक्षा अधिक किंवा 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत.

निवड प्रक्रिया

इंडियन आर्मीमध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममध्ये उमेदवारांची कोणतीही परीक्षा होणार नाही. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना मुलाखतीला बोलावलं जाईल. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड द्वारे मुलाखतीची प्रक्रिया राबवली जाईल. ही प्रक्रिया 5 दिवस चालते. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना मेडिकल उत्तीर्ण व्हावं लागेल.

संबंधित बातम्या:

SBI SCO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर संधी, 42 हजारांपर्यंत पगार मिळणार

NLC Exam 2021: हेल्थ इन्स्पेक्टर परीक्षेसाठीचं अ‍ॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड

(Indian Army Recruitment 2021 NCC Entry in Short Service Selection)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें