
भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. टेक्निकल एंट्री स्कीम (TES-54) अंतर्गत 2026 च्या जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी भारतीय सैन्याने 90 जागांसाठी भर्ती जाहीर केली आहे. जर तुम्ही 10+2 (PCM) मध्ये किमान 60% गुण मिळवले असाल आणि JEE Mains 2025 परीक्षेत सहभागी झाला असाल, तर ही संधी तुम्हाला मिळू शकते. चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर तुम्हाला लेफ्टनंट म्हणून कायमस्वरूपी प्रमोशन मिळेल आणि वार्षिक पगार सुमारे 17-18 लाख रुपये असेल.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळातून 10+2 (PCM) मध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे सोबतच JEE Mains 2025 परीक्षेत सहभागी होणे अनिवार्य.
वय मर्यादा : 16.5 ते 19.5 वर्षे
राष्ट्रीयत्व : भारत, भूतान, नेपाळचा नागरिक, 1962पूर्वी भारतात स्थायिक झालेला तिबेटी निर्वासित किंवा काही विशिष्ट देशातून भारतात स्थायिक झालेला भारतीय वंशाचा असावा.
वैवाहिक स्थिती : अविवाहित पुरुष असावा.
शारीरिक पात्रता : भारतीय सैन्याच्या वैद्यकीय मानकांनुसार तंदुरुस्त असणे आवश्यक.
अधिकृत माहिती आणि नियमांसाठी joinindianarmy.nic.in ला भेट देणे आवश्यक आहे.
तीन वर्षे CME पुणे, MCTE म्हो किंवा MCEME सिकंदराबाद येथे मूलभूत लष्करी आणि अभियांत्रिकी प्रशिक्षण दिले जाते, त्यानंतर एक वर्ष IMA देहरादून किंवा प्री-कमिशन ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले जाते. हे चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अभियांत्रिकी पदवी प्रदान केली जाते आणि त्यांना लेफ्टनंट पदावर कायमस्वरूपी कमिशन मिळते.