AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Navy Job: भारतीय नौदलात दहावी पास उमेदवारांसाठी नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Indian Navy Job: देशाची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात 10वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

Indian Navy Job: भारतीय नौदलात दहावी पास उमेदवारांसाठी नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Indian Navy Job: दहावी पास उमेदवारांना नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी, जाणून कसा अर्ज करायचा ते
| Updated on: Aug 30, 2023 | 4:49 PM
Share

मुंबई : भारतीय नौदलात काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. स्वप्न उराशी बाळगून तरूण त्या दिशेने प्रयत्न करत आसतात. आता भारतीय नौदलात दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. आता दहावी पास उमेदवारांची देश सेवा करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण भारतीय नौदलातील पदासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही. तुम्ही अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in याबाबत माहिती घेऊ शकता. भारतीय नौदलात ट्रेड्समॅनसाठी अर्ज दाखल करू शकता. अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट 2023 पासून सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी 25 सप्टेंबर 2023 पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. रजिस्ट्रेशन आणि फी जमा करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर आहे. आता नेमक्या किती जागा आहेत आणि कसा अर्ज करावा ते जाणून घेऊयात..

भारतीय नौदलात एकूण किती जागा आणि किती पगार मिळणार

भारतीय नौदलात एकूण 362 जागा आहेत. यात जनरल क्लाससाठी 151 जागा, ओबीसीसाठी 97 जागा, ईडब्ल्यूएससाठी 35 जागा आहेत. अनुसूचित जातींसाठी 26 जागा आहेत. या पदासाठी निवड झाल्यास महिन्याला 18 हजार ते 56,900 इतका पगार मिळेल.

योग्यता आणि वय

भारतीय नौदलात भरतीसाठी विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट (आयटीआय) मधून रिलेटेड ट्रेडमधलं सर्टिफिकेट हवं. दुसरीकडे उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्षादरम्यान असणं गरजेचं आहे. जे उमेदवार आरक्षित श्रेणीत येतात त्यांना सरकारी नियमानुसार वयात सूट दिली जाईल.

अर्ज केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि डॉक्यूमेंट व्हेरिफेकशन प्रोसेसमधून जावं लागेल. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षा झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. त्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मेरिटच्या आधावर उमेदवारांना पोस्टिंग दिली जाईल.

असा दाखल कराल अर्ज

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन अपडेट्स नीट वाचून घ्या
  • होम पेजवर नोकरीवर क्लिक करा आणि आपली संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरा.
  • यानंतर ट्रेड्समॅन मेट, मुख्यालय, अंदमान आणि निकोबार कमांड पदासाठी पर्याय निवडा.
  • रजिस्ट्रेशनशी निगडीत सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करा आणि त्यानंतर अर्ज करा.
  • प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म डाऊनलोड करा आणि शेवटी एक प्रिंटआऊट घ्या.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.