AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Navy Recruitment 2021: इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, 69 हजारांपर्यत पगार मिळणार

भारतीय नौदलामध्ये सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 500 जागांवर भरती होणार आहे. Indian Navy SSR AA Recruitment

Indian Navy Recruitment 2021: इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, 69 हजारांपर्यत पगार मिळणार
Indian Navy SSR AA Recruitment
| Updated on: May 05, 2021 | 11:25 AM
Share

Indian Navy SSR AA Recruitment 2021नवी दिल्ली: भारतीय नौदलात नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर चांगली संधी आहे. भारतीय नौदलामध्ये सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 500 जागांवर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या दहावी, बारावी आणि शैक्षणिक गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी बनवली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांना परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल. लेखी परीक्षा 23 जुलै रोजी होणार आहे. (Indian Navy SSR AA Recruitment 2021 for 2500 posts registration last date today click here for details)

पदांचा तपशील

आर्टिफिसर अप्रेंटिस नाविक (Sailor AA) – 500 पदे

सेकंडरी रिक्रूट नाविक (Sailor SSR) – 2000 पदे

एकूण पदांची संख्या – 2500

भारतीय नौदलाची फेसबुक पोस्ट

पात्रता:

भारत सरकार/राज्य सरकार द्वारा मान्यताप्राप्त शाळा/बोर्डाकडून12 वी विज्ञान शाखेचीपरीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 12वी मॅथ्स, फीजिक्स विषय अभ्यासलेला असणं आवश्यक आहे. यासोबत बारावीमध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कंप्यूटर सायन्स यापैकी एका विषयाचा देखील समावेश असावा, आर्टिफीसर अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्यांना उमेदवारांना दहावीच्या परीक्षेला कमीत कमी 60 टक्के गुण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा नेमकी किती?

भारतीय नौदलातालील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांचा जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

निवड कशी होणार?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

वेतन किती मिळणार?

सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

पात्र आणि इच्छुक उमेदवार 26 एप्रिल पासून भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट www.joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज करु शकतात.

संबंधित बातम्या: 

Indian Navy Recruitment 2021: इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांची, अर्ज करण्यासाठी अखेरचे काही दिवस, 69 हजारांपर्यत पगार मिळणार

ICAI CA Exams Postponed: आयसीएआयनं 21 मेपासून सुरु होणाऱ्या सीएच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या, पुन्हा परीक्षा कधी?

(Indian Navy SSR AA Recruitment 2021 for 2500 posts registration last date today click here for details)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.