AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IB Recruitment 2021: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

गुप्तचर विभागात 527 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमेदवार पोस्टानं अर्ज पाठवू शकतात.

IB Recruitment 2021: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 4:02 PM
Share

नवी दिल्ली: गुप्तचर विभागात 527 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. उपसंचालक, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर, सीनियर रीसर्च ऑफिसर, रीसर्च असिस्टंट, वरिष्ठ परकीय भाषा सल्लागार, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, असिस्टंट जनरल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह, अकाऊंटंट, सुरक्षा अधिकारी, स्टाफ नर्स, केअरटेकर यासह इतर पदावर भरती प्रकिया आयोजित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

गुप्तचर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार विविध पदानुसार पदवी, दहावी, बारावी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांकडं ड्रायव्हिंग लायसन्स देखील असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

गुप्तचर विभागाच्यावतीनं विविध पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त वयोमर्यादा 56 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. तर, एसी, एसटी, ओबीसी, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

पदांचा तपशील

  1. उपसंचालक: 02
  2. डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर: 10
  3. ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर: 168
  4. सीनियर रीसर्च ऑफिसर: 02
  5. रीसर्च असिस्टंट: 02
  6. वरिष्ठ परकीय भाषा सल्लागार:01
  7. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर:56
  8. असिस्टंट जनरल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह: 96
  9. ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर : 13
  10. पर्सनल असिस्टंट: 02
  11. अकाऊंटंट ऑफिसर: 03
  12. अकाउंटंट: 24
  13. सुरक्षा अधिकारी : 08
  14. असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर: 12
  15. असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर (टेक्निकल): 10
  16. फीमेल स्टाफ नर्स :01
  17. ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर:52
  18. सिक्युरिटी असिस्टंट: 20
  19. केअरटेकर :05
  20. हलवाई कुक: 11
  21. मल्टी टास्किंग स्टाफ: 24
  22. लायब्ररी अटेंडंट:01

अर्ज कुठे करायचा?

गुप्तचर विभागाच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज उपलब्ध होईल. तो डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआऊट काढून सर्व माहिती भरून पोस्टानं पाठवायचा आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत 21 ऑक्टोबर आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता?

जॉईंट डेप्युटी डायरेक्टर/ इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली: 110021

 न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीत भरती

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडद्वारे प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. नोटिफिकेशननुसार एकूण 300 पदांवर भरती होणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी संधी आहे. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट newindia.co.in वर भेट द्यावी लागेल.

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. अर्ज दाखल करण्यासाठी 21 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला जाईल. अर्जाचं शुल्क 21 सप्टेंबर रोजीचं जमा करावं लागेल. दोन टप्प्यात परीक्षा आयोजित केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.मात्र, परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

इतर बातम्या:

Anil Parab : नारायण राणेंनी बाह्या सरसावल्या, पहिला धक्का अनिल परबांना देण्याची तयारी

कुणाची कोथळा काढण्याची भाषा तर कुणाची एन्काऊंटरची; राणेंना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या धमक्या

Intelligence Bureau has invited Offline Applications for the recruitment of 527 Post

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.