कुणाची कोथळा काढण्याची भाषा तर कुणाची एन्काऊंटरची; राणेंना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या धमक्या

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 25, 2021 | 2:45 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी राणेंना थेट धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. (shiv sena leader threatens narayan rane due to offensive statement on cm)

कुणाची कोथळा काढण्याची भाषा तर कुणाची एन्काऊंटरची; राणेंना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या धमक्या
केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी राणेंना थेट धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी राणेंचा एन्काऊंटर करण्याची, काहींनी त्यांचा कोथळा काढण्याची तर काहींनी राणेंच्या घरात घुसून हिशोब चुकता करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (shiv sena leader threatens narayan rane due to offensive statement on cm)

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केली होती. त्यावरून राज्यभरात पडसाद उमटत आहेत. यवतमाळचे शिवसेना पदाधिकारी संतोष ढवळे यांनी तर राणेंना थेट एन्काऊंटरची धमकी दिली आहे. शिवसेनेत अनेक माथेफिरू शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुखांचा आणि मातोश्रीचा अवमान आम्ही सहन करणार नाही. आम्ही शिवसैनिक या वक्तव्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिकांनो, त्याचा एन्काऊंटर आपणच वाचवला आहे. आपल्यालाच त्याचा एन्काऊंटर करायचा आहे. खूणगाठ बांधा त्यांचा एन्काऊटर करायला निघा, असं आवाहनच ढवळे यांनी केलं आहे.

कोथळाचा बाहेर काढेल

हिंगोलीतील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनीही राणेंना धमकी दिली आहे. राणेंना संदेश द्यायचा आहे. तू काय सांगतो कुठं यायचं कुठं यायचं? तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यात आहे. पोलीस प्रोटेक्शन बाजूला कर. या शिवाजी महाराजांच्या मावळ्याने एकटा येऊन तुला चारी मुंड्या चीत नाही केलं अन् तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नावाचा संजय बांगर नाही, अशी धमकीच बांगर यांनी दिली आहे.

घरात घुसून हिशोब चुकता करू

तर, राणेंचं हे बेताल वक्तव्य नाही, तर ते माजलेलं वक्तव्य आहे. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतरचा हा महिन्याभरातील हा माज आहे. विरोधी पक्षाने केवळ त्यांना भुंकण्यासाठीच सोडलं आहे. माझा त्या कोंबडी चोराला इशारा आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात मारण्याची भाषा करता. यापुढे जर बेदअदबीने वागला तर तुमच्या घरात घुसून तुमचा हिशोब चुकता करू, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. (shiv sena leader threatens narayan rane due to offensive statement on cm)

संबंधित बातम्या:

अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे मीडियाशी संवाद साधणार; ‘करारा जवाब’ देणार?

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेपूर्वीच नितेश राणेंचं मोठं विधान; म्हणाले, ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!

राणेंच्या स्वागतासाठी बालेकिल्ला कणकवली सज्ज, शहरांत गुढ्या उभारल्या, ‘दादांच्या’ समर्थनार्थ सगळीकडे फ्लेक्स

(shiv sena leader threatens narayan rane due to offensive statement on cm)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI