5

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेपूर्वीच नितेश राणेंचं मोठं विधान; म्हणाले, ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!

अटक आणि सुटकेच्या कालच्या नाट्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधणार होते. (nitesh rane)

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेपूर्वीच नितेश राणेंचं मोठं विधान; म्हणाले, ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!
nitesh rane
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 2:04 PM

मुंबई: अटक आणि सुटकेच्या कालच्या नाट्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधणार होते. त्यामुळे राणे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून मोठं विधान केलं आहे. या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Presidents rule is the only way out to ensure safety from thugs, says nitesh rane)

नारायण राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड आंदोलन केलं होतं. त्यामुळे या परिसरात वातावरण तंग झालं होतं. त्यानंतर संध्याकाळी युवा सेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. नितेश राणे यांनी हा फोटो ट्विट करत त्यावर भाष्य करताना हे मोठं विधान केलं आहे. याचा अर्थ पश्चिम बंगालप्रमाणे ही राज्य पुरस्कृत हिंसा होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्याची सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे. पण ते तर गुंडांचा सत्कार करताना दिसत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. त्यामुळे या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

राणे काय बोलणार?

नारायण राणे आज दुपारी 4 वाजता जुहु येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी राणे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेतून राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राणे यावेळी काही नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा आहे. या शिवाय राणे जन आशीर्वाद यात्रेच्या पुढील कार्यक्रमाबाबतही बोलणार असल्याचं सांगितलं जातं. सिंधुदुर्गात संचारबंदी लागू करण्यात आल्याने सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रा होणार की नाही? असा सवाल केला जात आहे. त्यावर राणेंच्या आजच्या पत्रकार परिषदेतून उत्तर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरेंकडून कौतुक

दरम्यान, काल रात्री युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.’ (Presidents rule is the only way out to ensure safety from thugs, says nitesh rane)

संबंधित बातम्या:

सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं ओपन चॅलेंज

मुंबईत वरुण सरदेसाईंच्या मोर्चावर पोलीसांचा लाठीमार, राणेंच्या घरासमोर राडा, कार्यकर्ते भिडले

Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर 

(Presidents rule is the only way out to ensure safety from thugs, says nitesh rane)

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले