AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra HSC Result 2022 Live : बारावीच्या विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या! निकालानंतर ‘या’ तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

Maharashtra HSC Result 2022 : ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल, ते पुन्हा पेपर रिचेकींगसाठी अर्ज करु शकतात.

Maharashtra HSC Result 2022 Live : बारावीच्या विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या! निकालानंतर 'या' तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्यात
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची..Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jun 08, 2022 | 1:33 PM
Share

मुंबई : बारावीचा ऑनलाईन निकाल (Maharashtra HSC Result 2022 Live) आज जाहीर होईल. ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर झाल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, ते ही स्पष्ट करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना (HSC Result 2022) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत शिवाय पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज करता येणार आहे. हे अर्जही ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकणार आहेत. 10 जूनपासून हे अर्ज बारावीच्या विद्यार्थ्यांना करता येऊ शकतील. त्यासाठी http:verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज (Online Result) विद्यार्थ्यांना करता येऊ शकेल. बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होईल. सर्व विद्यार्थी आणि पालकांना वेगावान आणि निकालाची अचूक माहिती टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळू शकेल. रोल नंबर, आईचं नाव आणि संबंधित माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना आपला निकाल टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहता येईल. त्यासाठी इथे क्लिक करा.

महत्त्वाच्या तारखा

ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल, ते पुन्हा पेपर रिचेकींगसाठी अर्ज करु शकतात. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासोबत या अर्जासाठीचं शुल्कही ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना भरता येऊ शकेल.

  1. पेपर रिचेकींगसाठी 10 जूनपासून ते 20 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत
  2. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत
  3. अर्ज करण्यासाठीचं शुल्कही ऑनलाईन भरता येणार
  4. नापास विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार
  5. पुरवणी परीक्षेसाठी 10 जूनपासूनच अर्जाची प्रक्रिया सुरु होणार
  6. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना http:verification.mh-hsc.ac.in या लिंकवर जावं लागेल.

किती पैसे मोजावे लागतील?

जर छायाप्रत हवी असेल तर प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये शुल्क

पुनर्मूल्यांकनासाठी ३०० रुपये प्रति विषय इतके शुल्क

गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये शुल्क

आधी छायाप्रत घेणं महत्त्वाचं

उत्तर पत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं आवश्यक असतं. छायापत्र मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत मुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात.

एकूण किती विद्यार्थी बारावी परीक्षेला बसलेत?

  1. एकूण विद्यार्थी 14 लाख 85 हजार 191
  2. मुलं – 8 लाख 17 हजार 188
  3. मुली – 6 लाख 68 हजार 003

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत यश येणार नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाईल. परुवणी परीक्षेसाठीदेखील 10 जूनपासून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरुन घेतले जाणार आहेत.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?