पोलीस भरतीबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे, भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता..

| Updated on: Apr 05, 2024 | 11:43 AM

Maharashtra police bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे पोलिस भरतीबद्दल हे मोठे अपडेट आहे. उमेदवारांसाठी मोठी संधी नक्कीच आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवार हे पोलिस भरतीची तयारी करताना दिसत होते. आता या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

पोलीस भरतीबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे, भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता..
police bharti
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून तरूण हे पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहताना दिसले. राज्य शासनाने मोठी घोषणा करत पोलिस भरतीची घोषणा केली. फक्त घोषणाच नाही तर या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 होती. आता एक मोठा निर्णय घेत ज्यांनी अर्ज केला नाही अशांना मोठा दिलासा हा देण्यात आलाय. अनेकांचे पोलिस होण्याचे स्वप्न असते. आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 होती. आता त्यामध्ये वाढ करून पंधरा दिवसांचा अधिक कालावधी हा देण्यात आलाय. म्हणजेच काय तर या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार हे 15 एप्रिल 2024 पर्यंत आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

विशेष बाब म्हणजे ही खरोखरच मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 17,311 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून पोलीस शिपाई आणि पोलीस बॅण्ड्समन 9,532 पदे, पोलीस शिपाई-वाहनचालक 1686 पदे, कारागृह शिपाई 1800, पोलीस शिपाई 4,293 पदे याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx# या लिंकवर जा आणि थेट अर्ज करा. https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या वेबसाईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आता 15 एप्रिल 2024 आहे. त्यानंतर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकणार आहेत. थेट पोलिस खात्यात काम करण्याची मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग लगेचच करा अर्ज.