MPSC News : दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जाहीर, आता निकालाची प्रतीक्षा

| Updated on: Nov 17, 2021 | 3:13 PM

अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आल्यानं पूर्व परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

MPSC News : दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जाहीर, आता निकालाची प्रतीक्षा
एमपीएससी
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तर तालिका जाहीर केली आहे. अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आल्यानं पूर्व परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. एमएपीएससीनं अंतिम उत्तर तालिका जाहीर झाल्याची घोषणा ट्विटरवरुन केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं ट्विट

कोरोना विषाणू संसर्गामुळं लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आयोगाच्या वेबसाईटवर भेट देऊन ती डाऊनलोड करुन घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

निकालाची प्रतीक्षा

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपतत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली आहे. येत्या काही दिवसात पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

जानेवारीमध्ये मुख्य परीक्षा

एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका प्रकाशित करण्यात आली आहे. एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा जानेवारी 2022 च्या दुसऱ्या आठवड्यानंतर घेण्यात येतील, असं कळवण्यात आलं होतं. त्याप्रमाणं जानेवारी महिन्यात मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

MPSC Update: सरकारकडून एमपीएससीला 7168 पदांसाठी मागणीपत्र, लवकरच भरती प्रक्रिया सुरु, दत्तात्रय भरणेंची माहिती

राज्य सेवा पूर्व परीक्षेचं शुल्क भरण्यासाठी शेवटची संधी, MPSC चा मोठा निर्णय

MPSC Update: सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबरला, एमपीएससीकडून प्रवेशपत्र आणि मार्गदर्शक सूचना जाहीर

Maharashtra Public Service Commission declared final answer key of group b combined pre exam now students waiting for result