MOES Recruitment 2021: पृथ्वी विज्ञान मंत्रालयात नोकरीची संधी, अर्ज कसा करावा हे जाणून घ्या

| Updated on: Aug 10, 2021 | 8:27 AM

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 81 रिक्त जागा भरल्या जातील. या पदांमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट (1, 2 आणि 3), सीनियर रिसर्च फेलो (SRF), टेक्निकल असिस्टंट आणि फील्ड असिस्टंट यांचा समावेश आहे.

MOES Recruitment 2021: पृथ्वी विज्ञान मंत्रालयात नोकरीची संधी, अर्ज कसा करावा हे जाणून घ्या
Government Jobs 2021
Follow us on

नवी दिल्लीः MOES Recruitment 2021: केंद्र सरकारच्या अंतर्गत संस्थेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने शास्त्रज्ञासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. उमेदवार या पदांसाठी MoES च्या अधिकृत वेबसाईट moes.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

अधिसूचनेनुसार एकूण 81 रिक्त जागा भरल्या जातील

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 81 रिक्त जागा भरल्या जातील. या पदांमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट (1, 2 आणि 3), सीनियर रिसर्च फेलो (SRF), टेक्निकल असिस्टंट आणि फील्ड असिस्टंट यांचा समावेश आहे. यामध्ये (MOES भर्ती 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया 24 जुलै 2021 पासून सुरू आहे आणि उमेदवार 20 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. यामध्ये (MOES भर्ती 2021), जे उमेदवार अर्ज करू इच्छितात त्यांनी अधिकृत वेबसाईट- moes.gov.in ला भेट देऊन अधिसूचना तपासणे आवश्यक आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज

या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- moes.gov.in वर जा.
वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर RECRUITMENTS विभागात जा.
आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे (MoES) जा.
त्यात विचारलेले तपशील भरून नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्या.

या पदांवर भरती होईल

प्रोजेक्ट सायंटिस्ट (I) – 29 पदे
प्रोजेक्ट सायंटिस्ट (II) – 35 पदे
प्रोजेक्ट सायंटिस्ट (III) – 3 पदे
वरिष्ठ संशोधन फेलो – 4 पदे
तांत्रिक सहाय्यक – 1 पद
फील्ड असिस्टंट – 9 पदे

पात्रता

या रिक्त पदानुसार (MOES Recruitment 2021), तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी असणे आवश्यक आहे. फील्ड असिस्टंट पदासाठी उमेदवाराने डिप्लोमा असावा. अधिक शैक्षणिक पात्रता माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना जारी करू शकतात.

पदांनुसार उच्च वयोमर्यादा

प्रकल्प शास्त्रज्ञ 3-45 वर्षे
प्रकल्प शास्त्रज्ञ 2-40 वर्षे
प्रकल्प शास्त्रज्ञ 1 – 35 वर्षे
सीनियर रिसर्च फेलो (एसआरएफ) – 32 वर्षे
तांत्रिक सहाय्यक – 50 वर्षे
फील्ड असिस्टंट – 50 वर्षे

निवड प्रक्रिया

जारी केलेल्या सूचनेनुसार उमेदवारांची मुलाखत प्रक्रियेद्वारे या पदांसाठी निवड केली जाईल. उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहिती (MOES भर्ती 2021) MoES च्या अधिकृत वेबसाईटवरून करू शकतात.

संबंधित बातम्या

PGCIL Apprentice Recruitment 2021: पॉवरग्रीडमध्ये 1110 पदांवर अप्रेटिंसची संधी, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक

BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , जीडी कॉन्स्टेबलच्या 269 पदांवर भरती

MOES Recruitment 2021: Job Opportunity in Ministry of Earth Sciences, Learn how to apply