AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Students: निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा! रिक्त पदांच्या विषयावर चर्चा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप एमपीएससी (MPSC) समन्वय समितीचे विद्यार्थी करत आहेत. त्याचबरोबर हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा त्यांनी दिलाय.

MPSC Students: निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा! रिक्त पदांच्या विषयावर चर्चा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
MPSC StudentImage Credit source: TV9 marathi
| Updated on: Aug 20, 2022 | 3:30 PM
Share

काल दहीहंडी उत्सव (Dahihandi Festival) ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत नेहमीप्रमाणेच हा उत्साह शिगेला पोहचलेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवात हजेरी लावली होती. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. या उत्सवात मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली जी घोषणा चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्रातील गोविंदांना (Govinda Maharashtra) सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळेल अशी ती घोषणा होती. या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय तर अनेकांनी त्याचा कडाडून विरोध केलाय ज्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप एमपीएससी (MPSC) समन्वय समितीचे विद्यार्थी करत आहेत. त्याचबरोबर हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा त्यांनी दिलाय.

अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू

मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीमध्ये भाग घेणाऱ्या गोविंदा पथकांतील गोविंदाना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी नाराज झालेत. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीचे विद्यार्थी करत आहेत. त्यासोबतच सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील या विद्यार्थ्यांनी दिला. आधीच अनेक पदे रिक्त असताना त्यावर चर्चा करायची सोडून सरकारची जुमलेबाजी करत असल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “गोविंदाना सुट्टी आणि विमा पण दिला. आमदार प्रताप सरनाईक आणि इतर लोकप्रतिनिधींनी दहीहंडीला खेळाच्या दर्जाची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याचबरोबर सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळाले आहे. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल, असेही ते म्हणाले. हे सर्वसामान्याचे सरकार आहे. करोना अजून संपलेला नाही. त्यामुळे उत्सव काळजी घेऊन साजरे करा. गणेशोत्सव देखील मोठया उत्सवात साजरे झाले पाहिजे, दोन वर्षे थांबलो. हा सण सर्वात मोठा सण आहे.” असेही त्यांनी म्हटले.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.