तरुणांनो तयारीला लागा! या जिल्ह्यांमध्ये मोठी पोलिस भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी…

Police Recruitment : अनेकांचे पोलिस होण्याचे स्वप्न असते. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. पोलिस भरतीला सुरूवात झाली असून लगेचच अर्ज करा. मोठी सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

तरुणांनो तयारीला लागा! या जिल्ह्यांमध्ये मोठी पोलिस भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी...
Police Recruitment
Updated on: Oct 31, 2025 | 8:15 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून सरकारी नोकरी करायची असेल तर फटाफट अर्ज करा. सर्वात विशेष बाब म्हणजे पोलीस होण्याची संधी आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. रत्नागिरीमध्ये एकून 108 पोलिस पदाची भरती होणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 171 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. अगोदर 50 गुणांची शारीरिक चाचणी आणि त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. शारीरिक चाचणीत पास झालेल्यांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाईल.

रत्नागिरी पोलीस अधीक्षक आस्थापन 2024-25 दरम्यान 108 पोलिस शिपाईपदाची रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही संकेतस्थळावर उमेदवाराला मिळेल. जळगाव पोलीस अधीक्षक आस्थापन  2024-25 मध्ये पोलिस शिपाई रिक्त 171 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेचे प्रसिद्धीपत्रक जाहिर करण्यात आलंय. 30 नोव्हेंबरपर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल.

या पोलिस भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही प्रमाणपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहेत. त्याशिवाय तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत. दहावी, बारावी आणि पदवीची मार्कशीट असणे आवश्यक आहे. दहावी पास उमेदवारही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकणार आहेत. जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून शिकत असल्यास तर गुणपत्रक आवश्यक आहे.

आधार कार्ड, पॅन कार्ड, डिप्लोमा किंवा आयटीआय केला असेल तर त्याची मार्कशीट, टीसी, कास्ट सर्टिफिकेट, वयाचा पुरावा, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, जर तुम्ही खेळाडू असाल तर त्याचे खेळाडू प्रमाणपत्र, वडील पोलिस विभागात असतील तर त्याचेही प्रमाणपत्र, महिलांसाठी असलेले 30 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र अशी अजून काही महत्वाची कागदपत्रे आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.