AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेला सुरूवात, ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

जवळपास सर्वांचेच सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. विविध ठिकाणी भरती प्रक्रिया देखील सुरू असते. मात्र, बऱ्याच वेळा आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दल माहिती नसते. सध्या पुणे महापालिकेकडून मोठी भरती प्रक्रिया ही राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

पुणे महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेला सुरूवात, 'हे' उमेदवार करू शकतात अर्ज
| Updated on: Dec 08, 2023 | 10:49 AM
Share

मुंबई : पुणे महानगरपालिकेकडून मोठी भरती प्रक्रिया ही राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून 77 पदे भरली जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेकडून ही भरती प्रक्रिया भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय याकरिता राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची उमेदवारांची परीक्षा ही घेतली जाणार नाहीये. फक्त थेट मुलाखतीमधूनच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. तब्बल 77 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने पदानुसार शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. यामध्ये प्राध्यापकपासून ते कनिष्ठ निवासी पदापर्यंत भरती केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण हे पुणेच असणार आहे. नुकताच याबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची मुलाखत ही पदानुसार दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या गुरूवारी आणि मंगळवारी घेतल्या जातील. मुलाखतीसाठी उमेदवारांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे येथे पोहचावे लागणार आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांना सर्व कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत.

वरिष्ठ निवासी पदासाठी एकून जागा 21, कनिष्ठ निवासी एकून जागा 19, सहायक प्राध्यापक एकून जागा 18, सहयोगी प्राध्यापक एकून जागा 12, प्राध्यापक एकून जागा 7 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही मोठी संधी असणार आहे.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे सर्वच पदांसाठी मुलाखत पद्धतीतूनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याच पदासाठी उमेदवाराला परीक्षा द्यायची नाहीये. या भरती प्रक्रियेत एकून 77 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिकेकडून राबवली जात आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना