AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी जॉबची सुवर्णसंधी, रेल्वनं काढली बंपर भरती, पगार आणि सुविधा जाणून घ्या एका क्लिकवर

तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये विविध विभागांमध्ये 1 हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली

सरकारी जॉबची सुवर्णसंधी, रेल्वनं काढली बंपर भरती, पगार आणि सुविधा जाणून घ्या एका क्लिकवर
| Edited By: | Updated on: Dec 26, 2024 | 8:30 PM
Share

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक खास बातमी आहेत. अहो, त्यातही केंद्र सरकारी कर्मचारी व्हायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) मंत्रालयीन आणि स्वतंत्र पदांच्या भरतीसाठी एक छोटी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अभियानांतर्गत रेल्वेच्या विविध विभागांमध्ये एकूण 1,036 पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांच्या प्रादेशिक RRB वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील वर्षी 7 जानेवारीपासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे. भारतीय रेल्वेमध्ये विविध विभागांमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक आणि प्राथमिक रेल्वे शिक्षक या पदांसाठी सर्वाधिक पदे भरण्यात येणार आहेत.

पद आणि पदांची संख्या

पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) – 187 पदे सायंटिफिक सुपरवायझर (एर्गोनॉमिक्स अँड ट्रेनिंग) – 3 जागा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय) – 338 पदे चीफ लॉ असिस्टंट – 54 जागा सरकारी वकील – 20 पदे फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर (इंग्लिश मीडियम) – 18 जागा सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग – 2 पद कनिष्ठ अनुवादक/हिंदी – 130 पद वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक – 3 पदे स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर – 59 जागा ग्रंथपाल – 10 पद संगीत शिक्षिका (महिला)- 3 पद प्राथमिक रेल्वे शिक्षक (विविध विषय) – 188 पदे सहायक शिक्षक, कनिष्ठ विद्यालय (महिला) – 2 पद लॅब असिस्टंट/स्कूल – 7 पद लॅब असिस्टंट ग्रेड 3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) – 12 जागा

अर्ज शुल्क किती?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये, तर एससी/एसटी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये भरावे लागेल.

किती पगार मिळेल?

पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीचे वेतन 47,600 रुपये, तर वैज्ञानिक पर्यवेक्षक (एर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण), मुख्य विधी सहाय्यक, सरकारी वकील (सरकारी वकील) आणि शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (इंग्रजी माध्यम) यासह प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय) यांना 44,900 रुपये सुरुवातीचे वेतन मिळेल.

त्याचप्रमाणे वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक/हिंदी, वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक, कर्मचारी व कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), प्राथमिक रेल्वे शिक्षक (विविध विषय) आणि सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ शाळा (महिला) यांना 35,400 रुपये प्रारंभिक वेतन मिळणार आहे.

तर लॅब असिस्टंट/स्कूल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 रुपये प्रारंभिक वेतन आणि लॅब असिस्टंट ग्रेड 3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये वेतन मिळेल.

पात्रता निकष काय आहेत?

सर्व पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार आरआरबीची अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?