रेल्वे भरती : 23 जुलैपासून 7 व्या टप्प्याची परीक्षा, पाहा अॅडमिट कार्ड कधी मिळणार..

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने 7 व्या टप्प्यातील एनटीपीसी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाच्या शेड्युलनुसार, आरआरबी एनटीपीसी फेज 7 च्या परीक्षा 23, 24, 26 आणि 31 जुलै 2021 रोजी घेण्यात येतील. (Railway recruitment board NTPC 7th phase Exam Admit Card)

रेल्वे भरती : 23 जुलैपासून 7 व्या टप्प्याची परीक्षा, पाहा अॅडमिट कार्ड कधी मिळणार..
फोटो : प्रतिकात्मक

मुंबई : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने 7 व्या टप्प्यातील एनटीपीसी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाच्या शेड्युलनुसार, आरआरबी एनटीपीसी फेज 7 च्या परीक्षा 23, 24, 26 आणि 31 जुलै 2021 रोजी घेण्यात येतील. त्याचबरोबर, 4 जुलै रोजी परीक्षेची प्रवेशपत्रं 4 दिवस आधी दिली जातील. उमेदवारांना अधिकृत साइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला बोर्डाने दिला आहे. (Railway recruitment board NTPC 7th phase Exam Admit Card)

रेल्वे बोर्डाच्या मते, 23 जुलै ते 31जुलै या कालावधीत 2.78 लाख उमेदवारांसाठी संगणक आधारित परीक्षेचा (CBT परीक्षा) 7 वा आणि शेवटचा टप्पा होणार आहे. कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे या टप्प्यातील परीक्षा घेता आली नाही. ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र 23 तारखेपासून ही परीक्षा होत आहे. कोविड नियमांनुसार सोशल डिस्टन्सिंग ठेऊन 50 टक्के क्षमतेने 76 शहरांमधील सुमारे 260 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे, असं रेल्वे बोर्डाने सांगितलं आहे.

परीक्षेअगोदर 4 दिवस अॅडमिट कार्ड

RRB-NTPC 7 व्या फेजधील परीक्षेच्या तारखेच्या चार दिवस आधी प्रवेशपत्रे अधिकृत वेबसाइटवर दिली जातील. परीक्षा केंद्राची माहिती व परीक्षेची वेळ अॅडमिट कार्डावर असेल. परीक्षेच्या या टप्प्यात परीक्षा देऊ इच्छित उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर व ई-मेलवर संबंधित माहिती मिळेल. परीक्षेचे प्रवेश पत्र 4 दिवस अगोदर दिले जाईल म्हणजेच प्रवेशपत्रं 19 जुलै रोजी मिळेल.

ट्रॅव्हलिंग अ‌ॅथॉरिटी पास 10 दिवस अगोदर मिळणार

रेल्वे बोर्डाची अधिकृत वेबसाईट rrbcdg.gov.in जाऊन आणि योग्य ती माहिती भरुन त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतील. याशिवाय ट्रॅव्हलिंग अथॉरिटी पास अर्थात विनामूल्य ट्रॅव्हल पास अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेच्या 10 दिवस आधी म्हणजेच 13 जुलै रोजी देण्यात येईल. महत्त्वपूर्ण माहिती आणि ताज्या अपडेटसाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाइट पाहत रहावी, अशी सूचना रेल्वे बोर्डाने केली आहे.

(Railway recruitment board NTPC 7th phase Exam Admit Card)

हे ही वाचा :

RRB NTPC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, कोणत्या पदासाठी किती पगार? वाचा सविस्तर

Oil India Recruitment 2021: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, ज्युनिअर असिस्टंट पदावर भरती

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI