RRB NTPC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, कोणत्या पदासाठी किती पगार? वाचा सविस्तर

रेल्वे भरती बोर्डानं (RRB) गुरुवारी 35 हजारपेक्षा जास्त पदांवर होणाऱ्या भरतीसाठी एनटीपीसी फेज 7 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. एनटीपीसी भरतीची ही शेवटच्या टप्प्यातील परीक्षा आहे.

RRB NTPC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, कोणत्या पदासाठी किती पगार? वाचा सविस्तर
Railway
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 1:17 PM

RRB NTPC नवी दिल्ली: रेल्वे भरती बोर्डानं (RRB) गुरुवारी 35 हजारपेक्षा जास्त पदांवर होणाऱ्या भरतीसाठी एनटीपीसी फेज 7 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. एनटीपीसी भरतीची ही शेवटच्या टप्प्यातील परीक्षा आहे. यामध्ये देशातील 2.78 लाख उमेदवार परीक्षा देणार आहेत. रेल्वे भरती बोर्डाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार एनटीपीसी फेज 7 ची परीक्षा 23, 24, 26 आणि 31 जुलै रोजी आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्राचं शहर आणि इतर माहिती उपलब्ध व्हावी यासाठी दहा दिवस अगोदर ट्रॅव्हल कार्ड अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. हे कार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी परीक्षेच्या दहा दिवस आधी आरआरबीच्या वेबसाईट वर लॉग इन करणे आवश्यक आहे. (RRB NTPC Phase 7 Exam Schedule declared check rrb ntpc salary and other details)

मास्कचा वापर अनिवार्य

आरआरबी कडून उमेदवारांना प्रवेश पत्रामध्ये उल्लेख केलेल्या कोरोना संबंधी नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. उमदेवारांना मास्क घातला असल्यासचं परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

आरआरबी एनटीपीसी प्रवेशपत्र कधी जारी करणार

आरआरबी एनटीपीसी परीक्षेचं वेळापत्रक नुकतेच जाहीर झालं असून याचा अ‌ॅडमिट कार्ड येत्या काही दिवसात जारी केले जाईल. रेल्वेच्या कोणत्याही परीक्षेचं अ‌ॅडमिट कार्ड हे परीक्षेच्या चार दिवस आधी जारी केलं जातं. त्यानुसार या वेळी देखील परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या चार दिवस अगोदर जारी केले जाईल. रेल्वे भरती बोर्डाच्या प्रादेशिक वेबसाईट वर जाऊन उमेदवार त्यांचे अ‌ॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी त्यांचा अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख सादर करावे लागेल.

RRB NTPC Salary: कोणत्या पदाला किती पगार?

ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट- 19,900 रुपये अकाऊंट्स क्लार्क कम टायपिस्ट- 19,900 रुपये ज्युनिअर टाइम कीपर- 19,900 रुपये ट्रैन्स क्लार्क- 19,900 रुपये कमरशिअल कम टिकट क्लार्क- 21,700 रुपये ट्रैफिक असिस्टंट- 25,500 रुपये सीनियर टाईम कीपर- 29,200 रुपये सीनियर कमरशिअल कम टिकट क्लार्क- 29,200 रुपये सीनियर क्लार्क कम टायपिस्ट- 29,200 रुपये ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट- 29,200 रुपये गुड्स गार्ड- 29,200 रुपये स्टेशन मास्टर- 35,400 रुपये कमरशिअल अप्रेंटिस- 35,400 रुपये

संबंधित बातम्या:

Oil India Recruitment 2021: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, ज्युनिअर असिस्टंट पदावर भरती

Jobs News: ESIC मध्ये रेसिडंट ऑफिसर पदावर भरती प्रक्रिया, मुंबई येथे थेट मुलाखतीद्वारे निवड (RRB NTPC Phase 7 Exam Schedule declared check rrb ntpc salary and other details)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.