AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Government Job: मेगा भरती, शासनाच्या या विभागात 19 हजार पदाची भरती, कधीपासून होणार प्रक्रिया, मंत्र्यांनी दिली माहिती

Maharashtra Government Job: राज्य शासनाच्या गृहविभागात यापूर्वी मोठी भरती झाली होती. आता महिला व बालविकास विभागात भरती होत आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे.

Maharashtra Government Job: मेगा भरती, शासनाच्या या विभागात 19 हजार पदाची भरती, कधीपासून होणार प्रक्रिया, मंत्र्यांनी दिली माहिती
| Updated on: Feb 13, 2025 | 1:56 PM
Share

Sarkari Naukri In Maharashtra: महाराष्ट्र शासनासोबत नोकरी करण्याची चांगली संधी राज्यातील महिलांना मिळणार आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मोठी भरती करण्यात येत आहे. ही भरतीप्रक्रिया 14 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. अंगणवाडी सेविका 5639 तर मदतनीस 13243 अशी एकूण 18 हजार 882 पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाच्या गृहविभागात यापूर्वी मोठी भरती झाली होती. आता महिला व बालविकास विभागात भरती होत आहे.

महिला व बालविकास विभागात 18 हजार 882 पदे पदांची भरती होणार आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती होणार आहे. या भरतीच्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यांनी ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.

18,882 पदांची भरती

आदिती तटकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. तसेच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

कम्युनिटी किचन करावे

राज्यातील 553 बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख 10 हजार 591 अंगणवाडी केंद्रे आहेत. 5639 अंगणवाडी सेविका आणि 13243 अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे होती. ती आता भरली जात आहे. महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावे, यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.