AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court Job 2022: सर्वोच्च न्यायालयाकडून पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ‘असा’ करा अर्ज

Supreme Court Job 2022 : पदवीधर आहात? सरकारी नोकरी शोधताय? चिंता नको. सर्वोच्च न्यायालयात नोकरीचे तुमचे स्वप्न होणार पूर्ण. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाकडून कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior court assistant) पदासाठी एकूण २१० पदांची भरती करण्यात येत आहे.

Supreme Court Job 2022: सर्वोच्च न्यायालयाकडून पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 'असा' करा अर्ज
सर्वोच्च न्यायालयImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2022 | 9:27 AM
Share

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Of India) पदवीधरांसाठी नोकरीची (Job Recruitment) सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदासाठी एकूण २१० पदांची ही भरती असून main.sci.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उमेदवाराला अर्ज करता येणार (Onilne Application) आहे. अर्जप्रक्रिया 10 जुलै 2022 रोजी बंद होईल. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणार अपेक्षित आहे. संबंधीत पदासाठी ठराविक परीक्षा शुल्क असून उमेदवारासाठी वयोमर्यादा असणार आहे.

असा करा अर्ज

  1. अर्ज करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईट main.sci.gov.in वर क्लिक करा.
  2. वेबसाईटच्या होम पेजवर recruitment सेक्शनवर क्लिक करा.
  3. Recruitment वर क्लिक केल्यानंतर भर्तीसाठीच्या अर्जावर क्लिक करा.
  4. त्यानंतर online registration वर क्लिक करून अर्ज भरता येईल.
  5. अर्ज केल्यानंतर ठराविक फी भरणे अनिवार्य आहे.
  6. अर्जाची प्रक्रिया तपासून शेवटच्या पेजवर सबमिट करून प्रिंट डाउनलोड करा.

पात्रता आणि वयोमर्यादा

ज्युनिअर कोर्ट असिस्टंट पदासाठी उमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग कमीतकमी ३५ शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तर उमेदवाराचे वय कमीतकमी १८ व जास्तीत जास्त ३० वर्ष असावे. आणखी माहितीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.

अशी होणार निवडप्रक्रिया

वरील पदासाठी उमेदवाराची लेखी परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखन चाचणी, वर्णनात्मक चाचणी होणार असून मुलाखत घेण्यात येईल. लेखी परीक्षेत (MCQs) प्रश्न असतील. लेखी परीक्षेत पात्र उमेदवाराला टंकलेखन चाचणीत सहभागी होणे अनिवार्य आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.