AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र शासनाची नोकरी हवी? थेट 2140 पदांसाठी भरती, इच्छुकांसाठी सुवर्णसंधी

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे ही महाभरतीच आहे. चला तर मग जाऊन घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे.

केंद्र शासनाची नोकरी हवी? थेट 2140 पदांसाठी भरती, इच्छुकांसाठी सुवर्णसंधी
| Updated on: Jan 05, 2024 | 12:44 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. तब्बल 2140 रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची सूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट बीएसएफमध्ये नोकरी तुम्ही करू शकता. या भरती प्रक्रियेतून 1723 पदे ही पुरूषाची तर 417 पदे ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही भरावी लागणार आहेत. अजून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे सुरू नाहीये. लवकरच याबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध केली जाईल. साधारणपणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एक महिला कालावधी हा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी दिला जाणार आहे.

या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in या ठिकाणी ट्रेडसमन भर्ती 2024 ची एक अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना https://rectt.bsf.gov.in/ साईटवर जाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे. तसेच उमेदवारांच्या विविध चाचण्या देखील घेतल्या जातील. शेवटी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्याला https://rectt.bsf.gov.in/ या साईटवर लक्ष द्यावे लागेल. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया तब्बल 2140 पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी ही मोठी संधी अजिबातच सोडून नये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....