AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया सुरू, थेट ‘या’ विभागात तब्बल इतक्या जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया सुरू, थेट 'या' विभागात तब्बल इतक्या जागांसाठी भरती
| Updated on: Dec 08, 2023 | 10:18 AM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. उमेदवाराने उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. इच्छुकांना संबंधित पत्त्यावर आपले अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. उशीर न करता उमेदवाने आपले अर्ज हे दाखल करावेत. नोकरीचे ठिकाण हे मुंबईच असणार आहे. ही भरती प्रक्रिया 18 जागेसाठी होत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकारीपासून ते दंत तंत्रज्ञ पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत असल्याने शिक्षणाच्या अट देखील पदानुसार आहे. या भरतीमध्ये भूलतज्ज्ञच्या पदाचा देखील समावेश आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज डिस्पॅच विभाग, जी बिल्डिंग, नायर हॉस्पिटल मुंबई या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 डिसेंबर 2023 असणार आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी आपले अर्ज हे दाखल करावेत. यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

अर्ज करताना उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी एकून पदसंध्या 1, बालरोग सल्लागार एकून पदसंख्या 1, सहाय्यक प्राध्यापक नेत्रविज्ञान एकून पदसंख्या 1, वैद्यकीय अधिकारी पदसंख्या 1, स्टाफ नर्स पदसंख्या 2, ऑडिओलॉजिस्ट पदसंख्या 1.

विशेष शिक्षक ग्रेड I एकून जागा 1, विशेष शिक्षक ग्रेड II एकून जागा 3, दंत तंत्रज्ञ एकून जागा 1, ऑर्थोपेडिक्स सल्लागार एकून जागा 1, व्यावसायिक समुपदेशक एकून जागा 1 आणि भूलतज्ज्ञ एकून जागा 1 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज पत्त्यावर पाठवावीत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना