भारतीय सुरक्षा दलात भरती व्हायचंय? मग ही तुमच्यासाठी मोठी संधी, अर्ज करण्याची सोपी पद्धत

| Updated on: Jan 22, 2021 | 11:18 PM

जर तुम्हाला भारतीय सैन्यात (Armed Forces) भरती व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे (CISF/CRPF Recruitment 2021).

भारतीय सुरक्षा दलात भरती व्हायचंय? मग ही तुमच्यासाठी मोठी संधी, अर्ज करण्याची सोपी पद्धत
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्हाला भारतीय सैन्यात (Armed Forces) भरती व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे (CISF/CRPF Recruitment 2021). केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात (CRPF) हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. जीडी कॉन्स्टेबल पदासाठी होणारी ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (SSC) केली जाईल. या भरतीची अधिसूचना (नोटिफिकेशन) 15 मार्चला निघेल (SSC Indian Armed Forces CISF/CRPF Recruitment 2021).

SSC ने जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी 2019 मध्ये 55 हजार पदांसाठी भरती केली होती. याशिवाय CRPF आणि CISF च्या माध्यमातून जवळपास 4000 पदांवर नियुक्ती केली होती. यावर्षी देखील कॉन्स्टेबल पदासाठी सीआरपीएफ आणि सीआयएसएफसाठी इतक्याच पदांची भरती होईल असा अंदाज वर्तवला जातोय.

SSC जीडी कॉन्स्टेबल भरतीच्या माध्यमातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो तिबेटन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दल, स्पेशल सुरक्षा दल, नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजेन्सी, आसाम रायफलसह अन्य दलांमध्ये भरती होईल. या भरतीबाबतची अधिकची माहिती अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ वर उपलब्ध करुन देण्यात आलीय.

शैक्षणिक पात्रता काय?

या पदांच्या भरतीसाठी अर्जदार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 18 वर्षे ते 23 वर्षे असणं बंधनकारक आहे. यापेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती या पदासाठी अर्ज करु शकणार नाही.

भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

1. अर्ज करण्यासाठी संबधित व्यक्तीला पहिल्यांदा भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ येथे जावं लागेल.

2. या वेबसाईटवर सर्वात वरती हिरव्या रंगाच्या टॅबमध्ये Apply हा टॅब आहे तेथे क्लिक करा.

3. या ठिकाणी SSC जीडी कॉन्स्टेबल भरतीचा फॉर्म निवडून भरा.

4. फॉर्म भरल्यानंतर त्याचं शुल्क देखील भरायचं आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी: रेल्वेत 1 लाख 40 हजार जागांसाठी मेगाभरती

रेल्वेमध्ये भरतीची सुवर्णसंधी, फक्त एक मुलाखत आणि मिळणार 2 लाखांपर्यंत पगार

नोकरी शोधताय? पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती

व्हिडीओ पाहा ;

SSC Indian Armed Forces CISF/CRPF Recruitment 2021