AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ स्मार्टफोन कंपनीने भारतात हलवले आपले ऑपरेशन, अनेक नोकऱ्या उपलब्ध; इथे करा थेट अर्ज

Nothing कंपनीचा उप-ब्रँड CMF, ज्याने आपले ग्लोबल मार्केटिंग ऑपरेशन्स भारतात स्थलांतरित केले आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. तर या क्षेत्रात करिअर करण्याची संधी शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हा आर्टीकल महत्त्वाची ठरू शकतो.

'या' स्मार्टफोन कंपनीने भारतात हलवले आपले ऑपरेशन, अनेक नोकऱ्या उपलब्ध; इथे करा थेट अर्ज
nothing phone
| Edited By: | Updated on: Jul 11, 2025 | 4:02 PM
Share

ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड Nothing चा उप-ब्रँड CMF सध्या भारतात मोठी घडामोड करत आहे. कंपनीने आपल्या ग्लोबल मार्केटिंग ऑपरेशन्स भारतात, विशेषतः गुरुग्राममध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून, सोशल मीडिया कंटेंट प्रोड्यूसरपासून ते मार्केटिंग मॅनेजरपर्यंत अनेक संधी खुल्या करण्यात आल्या आहेत.

कंपनीच्या सह-संस्थापकाची माहिती

Nothing चे सह-संस्थापक अकिस इवेंजेलिडिस यांनी या गोष्टीची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, “भारत हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं मार्केट आहे. त्यामुळेच आम्ही आमचं संपूर्ण ग्लोबल मार्केटिंग ऑपरेशन येथे हलवत आहोत.” कंपनीने ही भरती सुरू करताच https://careers.nothing.tech/ या लिंकवर विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

कोणत्या पदांसाठी आहेत संधी?

सध्या CMF कडून खालील पदांसाठी भरती सुरू आहे:

* प्रोजेक्ट मॅनेजर

* PR मॅनेजर

* सोशल मीडिया कंटेंट प्रोड्यूसर

* मार्केटिंग मॅनेजर

* ग्लोबल सोशल मीडिया मॅनेजर

* ग्लोबल प्रोडक्ट मार्केटिंग लीड

* कम्युनिटी मॅनेजमेंट असोसिएट

* ग्लोबल प्रोडक्ट मार्केटिंग मॅनेजर (स्मार्टफोन्स आणि स्मार्ट प्रॉडक्ट्स)

भारत का ‘हब’ बनतंय का?

सध्या भारतातील तामिळनाडूमध्ये Nothing आणि CMF चे प्रॉडक्ट्स असेंबल केले जात आहेत. यामध्ये सरकारच्या उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजनांचा (PLI Scheme) लाभ घेतला जात आहे, ज्यामुळे स्थानिक उत्पादनाला चालना मिळते. केवळ Nothing नव्हे, तर Apple सारख्या कंपन्याही भारताकडे ‘प्रोडक्शन बेस’ म्हणून पाहत आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला Apple ने भारतात iPhone उत्पादन वाढवण्याची घोषणा केली होती.

Phone 3 ची झलक आणि बाजारपेठेतील तयारी

Nothing ने नुकताच आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘Nothing Phone 3’ सादर केला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महागडा स्मार्टफोन मानला जात आहे. ‘Nothing Phone 2’ चा हा उत्तराधिकारी 15 जुलैपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी गमावू नका!

भारत सरकारच्या ‘Make in India’ उपक्रमाला पूरक ठरणाऱ्या अशा आंतरराष्ट्रीय कंपन्या आता भारतातच आपलं मार्केटिंग आणि प्रॉडक्शन ऑपरेशन्स शिफ्ट करत आहेत. त्यामुळे तरुणांसाठी नवीन नोकऱ्यांचे दरवाजे खुले होत आहेत. टेक्नॉलॉजी, मार्केटिंग आणि मिडिया क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर Nothing आणि CMF कडून सध्या उपलब्ध असलेल्या या संधी नक्कीच महत्त्वाच्या आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.