AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Resluts 2022: आई मोलमजुरी करते, स्वतः पेपर टाकायचा, मिळवले दहावीत 82 टक्के! परिस्थितीची जाणीव असणारा शुभम

दोन्ही मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव होती. शुभमने सुद्धा लहान वयातच आईला हातभार लावायला सुरुवात केली. आपल्या शिक्षणाचा खर्च स्वत: करण्यासाठी तो रोज सकाळी पेपर वाटत होता.

SSC Resluts 2022: आई मोलमजुरी करते, स्वतः पेपर टाकायचा, मिळवले दहावीत 82 टक्के! परिस्थितीची जाणीव असणारा शुभम
परिस्थितीची जाणीव असणारा शुभमImage Credit source: TV9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 4:43 PM
Share

नांदेड: सकाळी पाच वाजता उठायचं एजंसीला जायचं, तिथून वर्तमानपत्राचे गट्ठे उचलायचे आणि सायकलवर घरोघरी जाऊन वाटायचे असा शुभम संतोष कोडगिरवारचा नित्यक्रम. काल दहावीचा रिझल्ट (SSC Results 2022) लागला आणि शुभमला परीक्षेत दहावीत 82 टक्के गुण मिळाले! वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेला शुभम सकाळी पेपर (News Paper) टाकून घरी येऊन मग शुभम शाळेत जायचा,अभ्यास (SSC Examination Study) करायचा. इतक्या लहान वयात परिस्थितीचं भान ठेऊन त्यानुसार योग्य ती मेहनत घेणारे मुलं कमीच! शुभमने काम करून इतके गुण मिळवले आहेत जे खरंच कौतुकास्पद आहे

दोन्ही मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव

आपल्याला मुलाला शिकवण्यासाठी शुभमच्या आईने स्वतः तुटपुंज्या मानधनावर ग्रंथालयात काम केले. यापूर्वी त्यांचा मोठा मुलगा शंतनू हासुद्धा पेपर टाकून दहावीत 78 टक्के गुणांनी पास झाला होता. दोन्ही मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव होती. शुभमने सुद्धा लहान वयातच आईला हातभार लावायला सुरुवात केली. आपल्या शिक्षणाचा खर्च स्वत: करण्यासाठी तो रोज सकाळी पेपर वाटत होता. आता त्याने दहावीचे शिक्षण नुसते पूर्ण केले नाही तर दणक्यात 82 टक्क्यांसह पूर्ण केलंय असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या या कर्तृत्त्वामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

यशामुळे शुभममध्ये आत्मविश्वास वाढला

शुभम संतोष कोडगिरवारच्या या यशाबद्दल त्याचं खूप कौतुक होतंय. ज्या मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते, परिस्थितीवर मात करण्याची ज्यांची इच्छा आणि मेहनत करायची तयारी असते अशा मुलांना आयुष्यात योग्य त्या वेळी मदतीचा हात मिळणं गरजेचं असतं. समाजातील दानशुर व्यक्तीचा मदतीचा हात मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटनी मिळू शकते. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याधापक , शिक्षक, शिक्षिका, वृत्तपत्र विक्रेते बंडू अण्णा संगेवार, पत्रकार संदिप कामशेट्टे, किशोर संगेवार, ज्ञानेश्वर डोईजड, महेताब संदीप पिल्लेवाड, शेख, दत्तात्रय कांबळे, नामदेव श्रीमंगले यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले. या यशामुळे शुभममध्ये आत्मविश्वास वाढला असून त्याने आता येणा­-या प्रत्येक परीक्षेत चिकाटीने अभ्यास करून यश मिळविण्याचा निर्धारही केलाय.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.