‘या’ जिल्हा परिषदेमध्ये मेगा भरती, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी, ना परीक्षेचे टेन्शन ना…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आता अजिबातच उशीर न करता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. ही मोठी संधी आहे.

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. थेट जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदांनुसार असणार आहे. तब्बल 53 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेच फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
ही भरती प्रक्रिया 53 पदांसाठी होत आहे. यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकून जागा 18, वैद्यकीय अधिकारी एकून जागा 17, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ एकून जागा 9, किटकशास्त्रज्ञ एकून जागा 9 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही मोठी बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे एमबीबीएस किंवा बीएएमएस झालेले असावे. या भरती प्रक्रिसाठी 150 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. जर उमेदवार प्रवर्गातील असतील तर त्यांना यामध्ये सूट देण्यात आलीये. त्यांना शंभर रूपये फिस ही भरावी लागणार आहे. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी आॅफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी येथे पाठवायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांनी अर्ज करा. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही तुम्हाला साईटवर मिळेल. यामुळे ही मोठी संधीच अजिबातच सोडू नका आणि लगेचच करा अर्ज.
