AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC CSE Preliums Result 2022: UPSC CSE प्रीलिम्स रिझल्ट! यशस्वी उमेदवारांची नावे जाहीर,पाहा यादी

यूपीएससी सीएसई प्रीलिम्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2022 साठी डीएएफ-1 भरून अर्ज करावा लागेल. डीएएफ-1 भरणे आणि सादर करण्याच्या तारखा लवकरच आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

UPSC CSE Preliums Result 2022: UPSC CSE प्रीलिम्स रिझल्ट! यशस्वी उमेदवारांची नावे जाहीर,पाहा यादी
GATE PreparationImage Credit source: istockphoto.com
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 25, 2022 | 11:04 AM
Share

यूपीएससी सीएसई प्रीलिम्स 2022 (UPSC CSE Preliums Result 2022) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावेही यूपीएससीने जाहीर केली आहेत. याआधी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे रोल नंबर जाहीर करण्यात आले होते. यावर्षी 13,090 उमेदवार नागरी सेवा पूर्वपरीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण झाले होते. यूपीएससी https://upsc.gov.in अधिकृत वेबसाइटवर (Official Website Of UPSC) जाऊन उमेदवारनावं असलेली निकालाची पीडीएफ फाइल डाउनलोड करू शकतात. याशिवाय त्या फाईलची थेट लिंक सुद्धा आम्ही खाली दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन आपलं नाव त्यात आहेका ते बघू शकता शिवाय ती पीडीएफ डाउनलोडसुद्धा (Download PDF) करू शकता. ही परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे 11.52 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते.

अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांचे गुण जाहीर होणार

या परीक्षेच्या अंतिम निकालानंतर सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षा 2022चा कटऑफ जाहीर करण्यात येणार असल्याचे यूपीएससीने म्हटले आहे. पुढील वर्षी अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रीलिम्स परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे गुण आणि उत्तरपत्रिका जाहीर केल्या जातील.

डायरेक्ट लिंक – नावनिहाय निकालाची पीडीएफ

यूपीएससी सीएसई प्रीलिम्स 2021 कटऑफ

  • जनरल (General) – 87.54
  • ईडब्ल्यूएस (EWS) – 80.14
  • ओबीसी (OBC) – 84.85
  • एससी (SC) – 75.41
  • एसटी (ST) – 70.71

यूपीएससी सीएसई प्रीलिम्स 2020 कटऑफ

  • जनरल (General)- 92.51
  • ईडब्ल्यूएस (EWS) – 77.55
  • ओबीसी (OBC) – 89.12
  • एससी (SC) -74.84
  • एसटी (ST) – 68.71

यूपीएससी सीएसई प्रीलिम्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2022 साठी डीएएफ-1 भरून अर्ज करावा लागेल. डीएएफ-1 भरणे आणि सादर करण्याच्या तारखा लवकरच आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

ही परीक्षा देण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून परीक्षार्थीकडे पदवी असणे गरजेचे आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी, जे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत, ते विद्यार्थीही सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. मुख्य परीक्षेच्या वेळी उमेदवारांना त्यांच्या उत्तीर्ण असल्याचा निकाल दाखवावा लागणार आहे. उमेदवाराकडे व्यावसायिक किंवा तांत्रिक पात्रतेचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तर एमबीबीएस अंतिम वर्षाचे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थीही इंटर्नशिपशिवाय प्रिलिम परीक्षेला बसू शकतात मात्र मुख्य परीक्षेच्या वेळी इंटर्नशिपचा पुरावा दाखवणे आवश्यक असणार आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल