World Sanskrit Day: श्रावण पौर्णिमेला जागतिक संस्कृत दिवस का साजरा होतो? नेमका इतिहास काय? वाचा सविस्तर

जागतिक संस्कृत दिन किंवा संस्कृत दिन हा विश्वसंस्कृत दिनम म्हणूनही ओळखला जातो. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो.

World Sanskrit Day: श्रावण पौर्णिमेला जागतिक संस्कृत दिवस का साजरा होतो? नेमका इतिहास काय? वाचा सविस्तर
संस्कृत दिवस
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 1:42 PM

नवी दिल्ली: जागतिक संस्कृत दिन किंवा संस्कृत दिन हा विश्वसंस्कृत दिनम म्हणूनही ओळखला जातो. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेत, श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो. यंदा संस्कृत दिन 22 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज साजरा केला जात आहे. 2020 मध्ये संस्कृत दिवस 3 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला होता. तर, 2019 मध्ये तो 15 ऑगस्ट रोजी साजरा केला गेला होता.

संस्कृत भाषेचं पुनरुज्जीवन करण्याचा हेतू

संस्कृत दिन हा संस्कृत या प्राचीन भारतीय भाषेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संस्कृत भाषेबद्दल व्याख्यानांचं आयोजन केलं जातं.या दिवसाचा उद्देश संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करणे आणि तिचं संवर्धन करणे हा आहे. संस्कृत भाषेला उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आलंय. संस्कृत भाषेत सुमारे 102 अब्ज 78 कोटी 5 दशलक्ष शब्दांची सर्वात मोठी शब्दसंग्रह आहे.

नरेंद्र मोदी यांचं ट्विट

संस्कृत दिवसाचा इतिहास

जागतिक संस्कृत दिन किंवा संस्कृत दिन भारतात प्रथम 1969 मध्ये साजरा करण्यात आला. संस्कृत भाषेविषयी जागरूकता पसरवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी उत्सव साजरा केला जातो. संस्कृत भाषेला भारताच्या समृद्ध संस्कृतीचे हे वैशिष्ट्य मानलं जातं. संस्कृत दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये संस्कृत भाषेचं महत्व, त्याचा प्रभाव आणि या भाषेच्या संवर्धनाविषयी चर्चा केली जाते. हिंदू संस्कृतीत पूजा आणि मंत्रांचा जप संस्कृतमध्ये केला जातो. संस्कृत भाषेचा उगम भारतात सुमारे 3500 वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. संस्कृत भाषेला देव वाणी अर्थात देवाची भाषा असेही म्हणतात. संस्कृत भाषेची मुळे इसवी सन पूर्व 2000 पर्यंत जातात.

संस्कृत दिवसाचे महत्व

प्राचीन भारतीय भाषा संस्कृत विषयी जागृती करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासह पुनरुज्जीवित करण्यासाठी संस्कृत दिन साजरा केला जातो. संस्कृत भाषा शिकण्याचे आणि जाणून घेण्याचे महत्त्व या दिवशी सांगितलं जातं. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी समजली जाते.भारतात बोलल्या जाणाऱ्या प्राचीन भाषांपैकी ती पहिली असल्याची सांगण्यात येतं. संस्कृत

1969 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या आदेशाने, केंद्र आणि राज्य स्तरावर पहिला संस्कृत दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून संपूर्ण भारतात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो. प्राचीन भारतातील अध्यापन सत्र याच दिवशी सुरू झाले असल्यानं श्रावण पौर्णिमेची निवड करण्यात आली. संस्कृत भाषा दिवस आता भारतासह परदेशातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

इतर बातम्या:

Corona Third Wave : महाराष्ट्राला दिलासा? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी नवी माहिती, तज्ज्ञ म्हणतात…

आपण एक सामर्थ्यवान नेता गमावलाय; कल्याण सिंहांना प्रभू श्रीरामाच्या चरणाशी स्थान मिळो: मोदी

World Sanskrit Day celebrated on Shraavana Fool Moon Night know what is its history and importance

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.