स्टिअरिंग रॉड तुटून स्कूलबस धडकली झाडावर, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, कुठे घडला हा अपघात ?

वतमाळमध्ये उमरखेड तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. स्कूल बस झाडाला धडकून हा अपघात झाला असून त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृ्त्यू झाला आहे. तर इतर काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

स्टिअरिंग रॉड तुटून स्कूलबस धडकली झाडावर, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, कुठे घडला हा अपघात ?
स्कूलबस अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू
| Updated on: Jan 25, 2025 | 10:39 AM

यवतमाळमध्ये उमरखेड तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. स्कूल बस झाडाला धडकून हा अपघात झाला असून त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृ्त्यू झाला आहे. तर इतर काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. या अपघातामुळे प्रचंड खळबळ माजली असून विद्यार्थिनीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टुडन्ट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूलची ही बस असल्याचे समोर आले आहे. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान ही दुर्घटना घडली.  शाळेची ही बस उमरखेडच्या दिवटीपिंपरी वरून दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. मात्र अचानक स्कूलबसच्या स्टिअरिंग रॉड तुटला आणि नियंत्रण गमावून बस ही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाावर जाऊन आदळली अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

बस झाडावर जोरात आदळल्याने अनेक विद्यार्थी जखमी आझेल. त्यापैकी महिमा आप्पाराव सरकटे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ती दिवटीपिंपरी येथील निवासी असून इयत्ता 9वी मध्ये शिकत होती. इतर काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांनर उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आल आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.