AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वत:च्याच मुलांना रागावताना करावा लागेल 10 वेळा विचार; आई ओरडल्याने चिडलेल्या लेकीने थेट ट्रेनसमोर…

आजकाल मुलांना ओरडण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण छोट्याशा मुद्यावरूनही मुलं डोक्यात राग घालून घेतात आणि अशी एखादी , नको ती कृती करतात, ज्यामुळे एक क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं.

स्वत:च्याच मुलांना रागावताना करावा लागेल 10 वेळा विचार; आई ओरडल्याने चिडलेल्या लेकीने थेट ट्रेनसमोर...
| Updated on: Dec 11, 2023 | 12:43 PM
Share

मथुरा | 11 डिसेंबर 2023 : मुलांना शिस्त लागावी, वाईट सवयी लागू नयेत, त्यांचं आयुष्य चांगलं घडावं यासाठी आई-वडील त्यांना कधीकधी ओरडतात. त्यात काही गैर नाही. गेल्या कित्येक पिढ्यांपासून हे सुरू आहे. मात्र आजकाल मुलांना ओरडण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण छोट्याशा मुद्यावरूनही मुलं डोक्यात राग घालून घेतात आणि अशी एखादी , नको ती कृती करतात, ज्यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं.

आई ओरडली म्हणून रागावलेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. मथुरा येथे ही दुर्दैवी घटना घडली असून अवघ्या 13 वर्षांच्या लेकीने रेल्वे रुळावर जाऊन ट्रेन समोर उडी मारून स्वत:चं अनमोल आयुष्य एका क्षणात संपवून टाकलं.

शाळेत जायला नकार दिला म्हणून आई रागावली, पण…

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मथुरा येथे राहणारी ही 13 वर्षांची मुलगी शाळेत जाण्यास तयार नव्हती. त्याच मुद्यावरून तिचं आईशी भांडण झालं. काहीही झालं तरी शाळा बुडवायची नाही, ऊठ आणि सरळ शाळेत जा, असं सांगत तिची आई तिला ओरडली, एखाद-दुसरा धपाटाही तिने लेकीला घातला.

पण या सगळ्याचा त्या मुलीला प्रचंड राग आला. आई आपल्या चांगल्यासाठी सांगत्ये, हे लक्षात न घेताच त्या मुलीने राग डोक्यात घालून घेतला आणि ती घराबाहेर पडली. पण घरातून निघाल्यावर ती शाळेत गेलीच नाही. उलट संतापाच्या भरात ती अलवार- मथुरा रेल्वे ट्रॅकजवळ पोहोचली आणि समोरून येणाऱ्या ट्रेनखाली तिने स्वत:ला झोकून दिलं.

या संपूर्ण घटनेने मथुरा शहरात एकच खळबळ उडाली. अवघ्या 13 वर्षांच्या मुलीने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सगळेच मुळापासून हादरले. तिच्या घरच्यांची अवस्था तर अतिशय बिकट झाली. आपण ओरडलो म्हणून मुलीने थेट आयुष्यच संपवलं, हे ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.