AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : एखाद्या पिक्चरपेक्षाही भयंकर थरार... 4-5 जण आले आणि कारमध्ये कोंबलं, दिवसाढवळ्या तरुणाचं अपहरण; नाशिक हादरले

Video : एखाद्या पिक्चरपेक्षाही भयंकर थरार… 4-5 जण आले आणि कारमध्ये कोंबलं, दिवसाढवळ्या तरुणाचं अपहरण; नाशिक हादरले

| Updated on: Sep 18, 2025 | 2:43 PM
Share

एक लाईव्ह व्हिडीओही समोर आला असून 5-6 लोकं धाडकन आले, आणि त्यांनी तरूणाला पकडून, मारहाण करत गाडीत कोंबायचा प्रयत्न केलाय. ही भयानक घटना एका मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

कधी मुंबई, कधी पुणे तर कधी नाशिक… राज्यातील विविध शहरांमध्ये रोजच्या रोज गुन्ह्यांच्या एवढ्या घटना घडत आहेत ना सामान्य नागरिक धड सुखाने, निश्चिंतपणे श्वासही घेऊ शकत नाहीत. पुण्यात काल रात्री कोथरूमध्ये अचानक गोळीबार झाला. कारला साईड दिली नाही म्हणू एका गँगमधील तिघा-चौघांनी इसमावर गोळीबार केला, त्यात त्याच्या मानेला, मांडीला गोळी लागल.पुणेकरा यामुळे भयभीत आहेत. हे कमी की काय म्हणून नाशिकमध्ये आता दिवसढवळ्या एका तरूणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला.

नाशिकच्या सातपूर पपया नर्सरी परिसरात भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. त्याचा एक लाईव्ह व्हिडीओही समोर आला असून 5-6 लोकं धाडकन आले, आणि त्यांनी तरूणाला पकडून, मारहाण करत गाडीत कोंबायचा प्रयत्न केलाय . तेजस ज्ञानदेव घाडगे असे पीडित तरूणाचे नाव असून त्याने त्या तरूणांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून जीव वाचवला आणि सातपूर पोलिसांत धाव घेत संपूर्ण प्रकार सांगत तक्रार नोंदवली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला मोबाईल शूटिंगच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तेजस घाडगे (वय 24) हा त्याच्या पत्नीसह नाशिकमधील सिडको येथे राहतो. अवघ्या महिन्यांपूर्वी, 24 मे रोजी तेजस याचं एक मुलीशी लग्न झालं. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. लग्नाआधी त्याच्या पत्नीचे नाशिकच्याच गिरीश शिंगोटे या तरूणावर प्रेम होतं. 2014 ते 2024 पर्यंत त्यांचे प्रेमसंबध होत. मात्र अखेर त्या तरूणीचं तेजसशी लग्न झालं,पण तेव्हापासून आरोपी गिरीश हा तेजसला मारून टाकण्याची धमकी देत होता.

71 वर्षांची ती लग्न करण्यासाठी अमेरिकेहून भारतात आली, बेपत्ता झाली; अनेक महिन्यांनी उलगडलं गुपित.. तिच्यासोबत काय घडलं?

5-6 जण आले आणि मारत गाडीत कोंबलं

काल (17 सप्टेंबर) तेजस हा दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्या मित्राला भेटण्यासाठी त्र्यंबक रोड येथे असलेल्या त्याच्या चहाच्या टपरीवर गेला होता. तेथे तो, त्याचा मित्र व त्याच्या वडीलांसाह नाष्ट्याचे हॉटेल टाकण्याची चर्चा करत होता. तेवढ्यात गिरीश शिंगोटेचे मित्र शैलेष कुवर उर्फ बंटी, अक्षय पवार, व त्यांचे चार ते पाच साथीदार हे त्या ठिकाणी आले. त्यांच्याजवळ पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार होती. त्यांचैपीक काही लोकांनी तेजसला खाली ये म्हणत टपरीतून ओढून काढलं.

त्यानंतर आणखी चार ते पाच जण आले व त्यांनी तेजसला बळजबरीने गाडीमध्ये बसवण्यास सुरूवात केली. त्याने त्या तरूणांना विरोध केला असता तरूणांनी तेजसला मारहाण केली व बळजबरीने स्विफ्ट गाडीमध्ये टाकून,कार गाडी सातपूर कॉलनी मध्ये नेली. गाडीमध्ये त्यांनी तेजसला बुक्के हाणत मारहाण केली. आरोपींपैकी एकाने तेजसचा मोबाईल खेचून घेतला आणि त्याचे लॉकही तेजसकडून ओपन करून घेतलं.

Pune Crime : विद्येचं की गुन्ह्यांचं माहेरघर ? गोळीबाराने पुणेकर पुन्हा हादरले

त्यानंतर श्रीराम चौक येथून त्र्यंबक रोडने गाडी घेवून जात असताना शिव हॉस्पीटल जवळ आली असता जीव वाचवण्यासाठी तेजसने कशीबशी कारमधून उडी मारली. आरोप तरूण पुन्हा पकडतील म्हणून त्याने रिक्षा पकडून पपाया नर्सरी येथील ट्रॅफिक पोलीस चौकीत गाठली. तेजस त्यांच्या तावडीतून पळून जावून पोलीस चौकीत बसल्यामुळे सर्व आरोपी कारमधून पळून गेले. तेजसने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला असता पोलिसांनी त्याला धीर दिला. गिरीश शिंगोटे यानेच त्याच्या मित्रांसोबत मिळून मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने माझे अपहरण केले होते, असे सांगत पोलिसांमध्ये तक्रा दाखल केली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Published on: Sep 18, 2025 02:30 PM