प्राइवेट पार्टवर गंभीर जखमा, छातीवर नखांच्या खुणा! विद्यार्थिनीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हैराण करणारा
बिहारच्या पाटनामधील मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीवर अत्याचार झाल्याचा संशय. तिच्या प्राइवेट पार्टवर जखमा आणि छातीवर नखांच्या खुणासह अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

Patna Crime Case: सध्या राज्यासह अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसत आहेत. अशातच कोलकात्यातील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना ताजी असताना आता बिहारची राजधानी पाटना येथे एका NEETची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देशाला पुन्हा एकदा हादरवून सोडलं आहे. अनेक दिवस कोमाशी झुंज देणाऱ्या या वैद्यकीय विद्यार्थिनीचा 10 जानेवारी 2026 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर तिच्या पोस्टमार्टम अहवालात समोर आलेले धक्कादायक खुलासे ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल.
सुरुवातीला पोलिसांनी हा मृत्यू झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यामुळे झाल्याचं म्हटलं होतं. पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलेल्या निष्कर्षांमुळे ही कहाणी पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अहवालानुसार, ही घटना सामूहिक बलात्काराकडे स्पष्टपणे इशारा करणारी आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा निर्भया प्रकरण आणि कोलकात्यातील ट्रेनी डॉक्टरवरील अत्याचाराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये, विद्यार्थिनीच्या शरीरावर नखांनी ओरबाडल्याचे खोल जखमेचे निशाण आढळून आले आहेत. हे जखमांचे स्वरूप जबरदस्तीने आणि तीव्र हिंसा झाल्याचं स्पष्ट संकेत देतात. डॉक्टरांनी असा संशयही व्यक्त केला आहे की एकाहून अधिक व्यक्तींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असावा.
इतकंच नाही तर अहवालात इंजेक्शन किंवा काही औषध दिल्याची शक्यताही नमूद करण्यात आली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मते, पीडितेला नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा बेशुद्ध करण्यासाठी औषधाचा किंवा इंजेक्शनचा वापर करण्यात आला असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
शरीरावर ठिकठिकाणी जखमा
पोस्टमार्टममध्ये विद्यार्थिनीच्या चेहरा, मान, खांदे आणि शरीराच्या वरच्या भागावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. यासोबतच तिच्या गुप्तांगाच्या आसपास सूज, गंभीर दुखापती आणि आत-बाहेर जखमा असल्याचं स्पष्ट झालं आहे. या सर्व खुणा तिच्यावर शारीरिक अत्याचार आणि प्रचंड हिंसा झाल्याचाच पुरावा देतात.
मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी हॉस्टेल संचालकावर थेट हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, ही घटना दडपण्यासाठी सुरुवातीपासूनच तिला आत्महत्येचा रंग देण्यात आला. झोपेच्या गोळ्या खाल्ल्याची कथा बनवून सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आता पोस्टमार्टम अहवालामुळे त्यांचा संशय अधिकच वाढला आहे.
