Pune Crime : विद्येचं की गुन्ह्यांचं माहेरघर ? गोळीबाराने पुणेकर पुन्हा हादरले
पुण्यात नाना पेठेतील हत्येच्या घटनेनंतर कोथरूडमध्ये मध्यरात्री झालेल्या गोळीबाराने पुन्हा एकदा पुणेकरांना धास्तावले आहे. निलेश घायवळ टोळीने केल्याचा संशय असलेल्या या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अतिशय शुल्लक कारणावरून झालेल्या या गोळीबाराने पुन्हा एकदा शहरातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेला गोळीबार आणि गँगवार यामुळे धास्तावलेले पुणेकर अद्याप सावरलेले नसतानाच आता पुण्यात पुन्हा मोठा गोळीबार आहे. 5 सप्टेंबरला नाना पेठेत आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडले. यामुळे संपूर्ण पुण्यात खळबळ माजली. मात्र ते प्रकरण अद्याप शांत झालेले नसतानाच आता पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटनाघडली आहे. कोथरूड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास फायरिग झाल्यामुळे पुणेकर चांगलेच धास्तावले आहेत. कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीकडून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अतिशय शुल्लक कारणावरून हा गोळीबार झाल्याचे समजते. कोथरुड भागातून जात असताना पुढे जाण्यास कारला साईड न दिल्यामुळे भडकून हा गोळीार करण्यात आल्याचे वृत्त आहे. या धक्कादायक घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गाडील दिली नाही साईड,भडकून सटासट गोळ्याच झाडल्या
मिळालेल्या माहिताीनुसार, रोहित आखाड, गणेश राऊत , मयुर कुंभार आणि मुसा शेख यांनी हा गोळीबार केला आहे. कोथरूड या नागरी भागात मध्यरात्री गोळीबाराचा थररा रंगला. शांत झोपेत असलेले पुणेकर या गोळीबारामुळे दचकून उठले आणि अजूनही धास्तावलेले आहेत. प्रकाश असं जखमीचं नाव असून आरोपींपैकी मयुर कुंभारेने गोळीबार केल्याचे समजते. त्याने धडाधड तीन गोळ्या झाडल्या, त्यामध्ये प्रकाश यांच्या मांडीला व मानेला गोळी लागली. त्यांच्यावर सध्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
घायवळ टोळीचे गुंड कोथरूड येथून जात असताना त्यांच्या कारला पुढे जाण्याल एका कारचालकाने साईड दिली नाही. त्यामुळे हे आरोपी संतापले आणि त्याच रागाच्या भरात त्यांनी त्या समोरच्या कारमधील प्रकाश नावाच्या व्यक्तीवर फायरिगं केलं. आरोपींनी त्याच्यावर तीन राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे.
गाडीला साईड दिली नाही म्हणून पुण्यातील कोथरुड भागात गोळीबार करण्यात आला आहे. निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पुण्यातील कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. प्रकाश दुरगुडे असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपींपैकी मयुर कुंभारेने गोळीबार केलेला आहे. तीन गोळ्या झाडल्यात. मानेला आणि मांडीला गोळी लागलीय. त्यामुळे बरंच रक्त वाहून गेलं. जखमी प्रकाशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या गोळीबाराचा कसून तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे.
मध्यरात्री कोथरूडमधील शिंदे चाळ परिसरात हा सगळा थराराक प्रकार घडलाय. गोळी लागल्याने तिथे मोठा रक्तस्त्राव झाला होता. सकाळी नागरिकांनी तिथलं रक्त धुवून काढलं, पण एवढं रक्त पाहून आम्हाला खूप भीती वाटली अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. या घटनेनंतर पुणेकर धास्तावले आहेत. पुण्यातील पोलीस अधिकारी करतात काय ? मध्यरात्री गोळीबाराची घटना घडल्याने पुणेकर सुरक्षित आहेत का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
