AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयानक ! पुण्यात कचऱ्यात आढळली 6-7 अर्भकं, धक्कादायक प्रकारामुळे खळबळ

पुण्यातील दौंडमध्ये कचऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकं आढळली आहेत. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये ही अर्भक सापडल्याची माहिती समोर आली आहे.

भयानक ! पुण्यात कचऱ्यात आढळली 6-7 अर्भकं, धक्कादायक प्रकारामुळे खळबळ
पुण्यात कचऱ्यात आढळली 6-7 अर्भकं
| Edited By: | Updated on: Mar 25, 2025 | 3:02 PM
Share

पुण्यातील दौंडमध्ये कचऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकं आढळली आहेत. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये ही अर्भक सापडल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे दौंडच्या बोरावकेनगरमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. ही अर्भकं कुठून आली पोलिसांकडून यासंदर्भात शोध सुरू आहे.

पुण्यातील दौंडमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दौंडच्या बोरावके नगरमध्ये एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकं ही आढळून आली आहेत. प्लास्टिकच्या बरणीमध्ये ती अर्भकं सापडली आहेत. त्यामध्ये अर्बकांचे काही शारीरिक अवशेष आढळले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात तेथील स्थानिकांनी दौंड पोलिस स्टेशनमध्ये जाऊन माहिती दिली. त्यानंतर दौंड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. ही अर्भकं नेमकी कोणाची आहेत, कोणत्या रुग्णालयाने ती फेकून दिली आहेत का, या अनुषंगाने सध्या दौंड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

राज्य महिला आयोगाकडून ट्विट

राज्य महिला आयोगाकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. ‘ पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात बोरावकेनगर मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक व मानवी अवशेष सापडल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. सद्यस्थितीत दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी केली आहे. पोलिसांनी याचा तपास व रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे.

हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी 2020 पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले अशी प्राथमिक माहिती आहे. राज्य महिला आयोग तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत,’ असे त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा