AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेतून आल्यावर तो गप्प-गप्प, आईने जवळ घेताच फुटला बांध ! स्पेलिंग आलं नाही म्हणून 7 वर्षांच्या चिमुकल्याला…

अंबरनाथच्या एका शाळेत ७ वर्षांच्या मुलाला स्पेलिंग चुकीसाठी शिक्षिकेने काठीने मारहाण केली. पीडित मुलाने आईला ही घटना सांगितल्यानंतर आईने पोलिसात तक्रार केली. शिक्षिकेवर अमानुष वागणूकीचा गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेने संतापाची लाट उसळली आहे आणि अशा निर्दयी वागणुकीवर नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

शाळेतून आल्यावर तो गप्प-गप्प, आईने जवळ घेताच फुटला बांध ! स्पेलिंग आलं नाही म्हणून 7 वर्षांच्या चिमुकल्याला...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 04, 2024 | 1:15 PM
Share

एका इंग्रजी शब्दाचं स्पेलिंग आलं नाही म्हणून निर्दयी शिक्षिकेने अवघ्या 7 वर्षांच्या मुलाला काठीने अमानुष मारहाण केल्याची अत्यंत भयानक आणि तेवढीच संतापनजनक घटना अंबरनाथमधील शाळेत घडली आहे. त्या शिक्षिकेने चिमुकल्या मुलाच्या पाठीवर आणि पायावर काठीने सपासप फटके दिले. ही घटना उघडकीस आल्यावर संतापाची लाट उसळली असून त्या निर्दयी शिक्षिकेविराधोत अंबरनाथ पश्चिम पोलिस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला जेलची हवा खावी लागणार आहे.

नेमकं झालं तरी काय ?

अंबरनाथ शहरातील पश्चिमेला असणाऱ्या साऊथ इंडियान शाळेत लहान मुलाला बेदम मारहाण केल्याचा हा अमानुष प्रकार घडला आहे. पीडित मुलगा अवघ्या 7 वर्षांचा असून तो या शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. घटनेच्या दिवशी त्या विद्यार्थ्याला त्याची वर्गशिक्षिका विजयश्री शकेवार हिने एका शब्दाचं स्पेलिंग विचारलं. मात्र त्या मुलाला काही ते स्पेलिंग सांगता आलं नाही, त्याचं ते स्पेलिंग चुकलं. ते पाहून चिडलेली शिक्षिका विजयश्री हिने काठी घेऊन त्या चिमुरड्या मुलाच्या पाठीवर आणि पायावर सपासप फटके दिले, त्याला अमानुष मारहाण केली.

या सगळ्यामुळे तो मुलगा अतिशय भेदरला. त्या दिवशी घरी आल्यावरही तो गप्प-गप्पच होता. मुलाचं काहीतरी बिनसलंय हे लक्षात आल्यावर त्याच्या आईने त्याला प्रेमने जवळ घेऊन विचारपूस केली असता त्याचा बांध फुटला. आणि त्याने रडत रडत आईला शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगितला. शिक्षिकेने मुलाला मारहाण केल्याचं ऐकून त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र तिच्या या वागण्याविरोधात आवाज उठवण्यासाठी पीडित मुलाच्या आईने अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षिका विजयश्री शकेवार हिच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्या आधारे पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून त्यामुळे आता या शिक्षिकेला जेलमध्ये जावं लागणार आहे. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये संतापाची लाट उसळली असून लहान मुलांना अशी अमानुष वागूक कोणी कसं देऊ शकतं असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना