AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासूच्या दागिन्यांनी मला सजवा, पण स्पर्श करू नका..; सुहागरात्रीसाठी नवरीने सांगितली अनोखी परंपरा अन् मग…

एका नवरीने सुहागरात्री असे कांड केले की, नवरा आणि त्याचे संपूर्ण कुटुंब हादरून गेले. परंपरेच्या नावाखाली तिने त्यांना चांगलाच चूना लावून लावला. आता पोलीस त्या नवरीच्या शोधात आहेत.

सासूच्या दागिन्यांनी मला सजवा, पण स्पर्श करू नका..; सुहागरात्रीसाठी नवरीने सांगितली अनोखी परंपरा अन् मग...
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 30, 2025 | 3:30 PM
Share

एक नवरा मोठ्या थाटामाटात आपली नवरी घरी घेऊन आला. नवरा खूप खुश होता. सर्व रीतीरिवाज पूर्ण झाल्यानंतर सुहागरात्रीची वेळ आली. पण नवऱ्याला माहीत नव्हतं की त्याच्यासोबत काय होणार आहे. नवरीने आधी नवऱ्याला सांगितलं, “सासूचे सर्व दागिने घेऊन ये.” नवऱ्याने दागिने आणले. मग ती म्हणाली, “आज रात्री माझ्यापासून दूर राहा, ही आमची परंपरा आहे.” नवरा तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत राहिला. तो बिचारा दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. त्यानंतर जे कांड झालं ते ऐकून पोलिसही हादले.

नेमकं काय घडलं?

राजस्थानमधील अजमेर येथे ही घटना घडली. एक नवरा थाटामाटात लग्न करुन घरी परतला होता. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले. नवरी मात्र नवऱ्याला मला स्पर्श करु नको. दूर रहा. सासूचे दागिने घेऊन या आणि मला दागिन्यांनी सजवा असे बोलत होती. नवऱ्यानेही तिचे ऐकले. त्याने तिला दागिन्यांनी सजवले आणि दुसऱ्या खोलीत झोपण्यास सांगितले. पण मध्यरात्री जेव्हा त्याने खोलीचा नजारा पाहिला, तेव्हा तो थक्क झाला. नवरी तर घरातून गायब झाली होती आणि सोबत सर्व दागिनेसुद्धा घेऊन पळाली होती.

वाचा: नणंदेसोबत बायकोचे रोमँटिक चॅट, नवऱ्याला समजताच… 7 वर्षांचे नात्यात नको ते घडलं

रडत-रडत नवरा पोलिसांकडे पोहोचला

रडत-रडत नवरा पोलिसांकडे गेला आणि त्याने नवरीविरुद्ध FIR दाखल केली. माहितीनुसार, पीडिताचे नाव जितेंद्र आहे. जितेंद्रने सांगितले की, एका दलालाने त्याचे नाते आग्रा येथील एका मुलीशी ठरवले होते. बदल्यात त्याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. नवऱ्याच्या कुटुंबाने ही रक्कमही दिली. त्यानंतर जयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले. नंतर नवरी आपल्या नवऱ्यासोबत किशनगढला पोहोचली, जिथे तिचे सासर होते.

सुहागरात्री परंपरेचा बहाणा

नवरीचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले. त्यानंतर सुहागरात्रीच्या वेळी नवरीने परंपरेच्या नावाखाली नवऱ्याला सांगितले की, पहिल्या रात्री ती त्याच्यासोबत झोपू शकत नाही. नवरा तिच्या गोड बोलण्याला फसला. नवरीने त्याला हेही सांगितले की, परंपरेनुसार, ती सासूचे दागिने एका रात्रीसाठी घालणार आहे. सासूनेही तिला दागिने दिले. पण रातोरात नवरीने त्यांच्यासोबत खेळ खेळला. ती कधी घरातून पळाली, हे कोणालाच कळलं नाही.

मध्यरात्री नवऱ्याची झोप उघडली

नवऱ्याची मध्यरात्री तीन वाजता झोप उघडली. त्याला पाणी प्यायचं होतं. तेव्हा त्याने पाहिलं की, नवरीच्या खोलीचा दरवाजा उघडा आहे. नवरा आत गेला, तेव्हा त्याला दिसलं की, नवरी तिथे नाही. कपाटही उघडं पडलं होतं. तिथून सर्व दागिने गायब होते. नवऱ्याने गोंधळ घातला. कुटुंबातील इतर लोकही तिथे आले. नवरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती सापडली नाही. मग त्यांना कळलं की, नवरी त्यांना चूना लावून पळून गेली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून नवरी आणि दलाल जितेंद्र या दोघांचा शोध घेत आहेत. सध्या हे दोघेही फरार आहेत.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.