मुंबईहून इचलकरंजीकडे 35 प्रवासी घेऊन जाणारी बस पेटली, दैव बलवत्तर म्हणून…

कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येताच बसचा टायर पेटला आणि बसला आग लागली. बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी गेली.

मुंबईहून इचलकरंजीकडे 35 प्रवासी घेऊन जाणारी बस पेटली, दैव बलवत्तर म्हणून...
कराडजवळ खाजगी बसला भीषण आगImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 5:41 PM

कराड : मुंबईहून इचलकरंजीकडे 35 प्रवासी घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अचानक ग लागली. राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ वराडे हद्दीत ही घटना घडली. तळबीड पोलीस स्टेशन आणि महामार्ग कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला आहे. बसमधील सर्व 35 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. काळा आला होता पण दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

खाजगी ट्रॅव्हलची बस मुंबईहून इचलकरंजीला चालली होती

संजय ट्रॅव्हलची खाजगी बस मुंबईहून मुंबईहून इचलकरंजीला चालली होती. या बसमध्ये 35 प्रवासी होते. कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येताच बसचा टायर पेटला आणि बसला आग लागली. बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी गेली.

आगीचे वृत्त कळताच पोलीस आणि महामार्ग देखभाल कर्मचारी घटनास्थळी हजर

बसने पेट घेतल्याची माहिती कळताच तळबीड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि महामार्ग देखभाल कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवण्यात आले.

हे सुद्धा वाचा

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

कराड नगरपरिषदेचा अग्निशामक दलाचा बंब बोलावण्यात आला. अग्निशामक दलाने बसला लागलेली आग विझवण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर बर्निंग कारचा थरार

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. पालघरमधील सातीवली येथे धावत्या इनोव्हा कारने अचानक पेट घेतला. सुरतहून मुंबई एअरपोर्टला जात असताना इनोव्हाला आग लागली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. इनोव्हा कारमधील तिन्ही प्रवाशी सुखरूप आहेत. घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.