खरेदीच्या बहाण्याने दुकानात घुसला, मग दुकानदार महिलेला बोलण्यात गुंतवून लक्ष विचलित केले, मग…

| Updated on: May 03, 2023 | 4:26 PM

ग्राहक बनून दुकानात आला आणि वस्तू दाखवण्यास सांगितल्या. वस्तू दाखवण्याच्या बहण्याने दुकनदार महिलेचे लक्ष विचलीत करुन चोरट्याने हात साफ केला.

खरेदीच्या बहाण्याने दुकानात घुसला, मग दुकानदार महिलेला बोलण्यात गुंतवून लक्ष विचलित केले, मग...
डोंबिवलीत ग्राहक बनून आलेल्या चोरट्याने मोबाईल चोरला
Image Credit source: TV9
Follow us on

सुनील जाधव, डोंबिवली : ग्राहक बनून दुकानात येत दुकानदार महिलेचे लक्ष विचलीत करुन चोरट्याने मोबाईल लंपास केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी दुकान मालकीण सविता राजाराम गायकवाड यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविता यांच्या मालकीचे रामनगरमधील जयसुंदरम बिल्डींगच्या तळमजल्यावर पेट वेलनेस नावाचे दुकान आहे. सदर दुकान सकाळी 10.30 ते रात्री 9.30 दरम्यान चालू असते. सीसीटीव्हीच्या आधारे रामनगर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ग्राहक बनून दुकानात आला

सविता गायकवाड यांचे डोंबिवली पूर्वेकडील रामनगर परिसरात पाळीव पशू-पक्षांसाठी लागणाऱ्या खाद्य आणि इतर सामान विक्रीचे पेट वेलनेस नावाचे दुकान आहे. रविवारी 30 एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास एक अनोळखी इसम दुकानात आला. त्याने दुकानदार महिलेला दुकानातील पिशव्या दाखवण्यास सांगितले. अनेक पिशव्या बघितल्या आणि बघून पसंत नाही, असे सांगून थोड्या वेळाने दुकानातून निघून गेला.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु

यानंतर सविता या रॅकवर ठेवलेला मोबाईल शोधू लागल्या. दुकानातील सर्व रॅक आणि ड्रॉव्हर तपासले. मात्र मोबाईल कुठेही आढळून आला नाही. संशय आल्याने त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा मात्र फुटेजमध्ये ग्राहक म्हणून दुकानात आलेला चोरटा रॅकवर ठेवलेला मोबाईल घेऊन जाताना दिसून आला. दुकानाच्या मालकीण सविता यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा