दिवाळीची खरेदी सुरू होती…बाचाबाची झाली…नंतर टोळक्याने दुकानात शिरून दांडके आणि कोयत्याने केला हल्ला…

नाशिकच्या गंगापूर रोड येथील कपडा विक्रेता कलीम मुल्ला यांच्यावर दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या टोळक्याने विक्रेत्यावरच क्षुल्लक कारणावरुण हल्ला केला आहे.

दिवाळीची खरेदी सुरू होती...बाचाबाची झाली...नंतर टोळक्याने दुकानात शिरून दांडके आणि कोयत्याने केला हल्ला...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 16, 2022 | 1:59 PM

Nashik Crime News : नाशिक शहरामध्ये पोलिसांचा (Nashik Poilice) गुन्हेगारांवर धाक राहिला नाही का ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहे. घरफोड्या, सोनसाखळी चोरी आणि मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहे. गंगापूर रोड (Gangapur Road) येथे एका कपडा विक्रेत्याला टोळक्याने क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केली आहे. कापड दुकानात शिरून लाकडी दांडके आणि कोयत्याने वार करत टोळक्याने कापड विक्रेत्याला जखमी केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने शॉपिंग करायला गेलेल्या प्रश्नावरून हा राडा झाला आहे. या टोळक्यापैकी दोघांना गंगापूर पोलीसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कापड विक्रेता या मारहाणीत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नाशिकच्या गंगापूर रोड येथील कपडा विक्रेता कलीम मुल्ला यांच्यावर दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या टोळक्याने विक्रेत्यावरच क्षुल्लक कारणावरुण हल्ला केला आहे.

गंगापूर रोड येथील मंडलीक यांच्या गाळ्यात कापड दुकान आहे. त्याच ठिकाणी दिवाळीच्या खरेदीसाठी काही तरुण आले होते. त्यात त्यांच्यामध्ये वाद झाला.

वादाच्या दरम्यान कापड विक्रेत्याला तरुणांनी शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली होती, त्यानंतर ते सर्व तरुण निघून गेले होते.

नंतर काही वेळातच तरुणांच्या टोळक्याने कापड विक्रेत्याला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली, त्यात त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली सोबत असलेल्या कोयत्याने देखील वार केले.

या घटणेने परिसरातील दुकान चालक – मालक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून या हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली जात आहे.