AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime: गाणं गुणगुणत डायरेक्ट किस मागीतला आणि… वकिलाने केला ज्युनिअर वकिल महिलेचा विनयभंग

ज्युनिअर वकिल महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका 40 वर्षीय वकीलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारमधून येताना गाणे गुणगुणत किसची मागणी केली, असे पिडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Pune Crime: गाणं गुणगुणत डायरेक्ट किस मागीतला आणि... वकिलाने केला ज्युनिअर वकिल महिलेचा विनयभंग
vanita kamble
vanita kamble | Updated on: Jul 27, 2022 | 10:05 PM
Share

पुणे : अत्याचार झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम वकील करतात. मात्र एका वकिलानेच त्याच्या सहकारी ज्युनिअर वकील महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात(Pune) घडली आहे. वकिलाने गाणं गुणगुणत डायरेक्ट किस मागत विनयभंग(lawyer molested) केल्याची तक्रार एका ज्युनिअर वकील महिलेने(junior lawyer woman) केली आहे. या घटनेमुळे महिला वकिलांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्ररकरणी तक्रार दाखल झाली आहे.

ज्युनिअर वकिल महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका 40 वर्षीय वकीलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारमधून येताना गाणे गुणगुणत किसची मागणी केली, असे पिडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

ऍड. धर्मराज जाधव (४०) यांच्यावर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 37 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 6 ते 27 जुलै या कालावधीत घडल्याचे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित या देखील वकिल आहेत. त्या जाधव यांच्याकडे ज्युनिअर वकिल म्हणून काम करत होत्या. यादरम्यान कामानिमित्त कारमधून एकत्र प्रवास करताना जाधव यांनी एक जुने गाणे म्हणत त्यांच्याकडे किस मागितल्याचा आरोप या ज्युनिअर वकिल महिलेने केला आहे. तसेच न्यायालयात देखील त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. इतकंच नाही तर याला विरोध केला असता त्यांना व त्याच्या पतीला शिवीगाळ केल्याचेही या ज्युनिअर वकिल महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

भाऊ वारला, पण वहिनी रात्री कुणाशी बोलत असते? डोक्यात संशय, दीराने उचललं भयंकर पाऊल

संशयाचा अंगात शिरलं की माणूस कोणत्या स्टेपला जातो याचा प्रत्यय (Ghaziabad) गाझियाबादमधील लोणी येथे आला आहे. शिवाय दिवसेंदिवस त्याच घटना होत राहिल्यास संशय अधिकच बळावतो आणि माणूस मागचा पुढचा कोणताही विचार न करता टोकाची भूमिका घेतो. भाऊ वारल्यानंतरही वहिनी रात्री अज्ञात व्यक्तीशी बोलत असल्याचा संशय घेत दीराने विधवा वहिनीच्या डोक्यात हातोडीने वार करुन तिची (Murder) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय आपणच हे कृत्य केल्याची कबुलीही मृताच्या दीराने पोलीसांना दिली आहे. वहिनीने फोन बोलल्याले घरातीलच कुणालाच आवडत नव्हते. असे असतानाही दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढल्याने दीराने हे कृत्य केले आहे. सदरील महिलेला तीन मुले असून 11 महिन्यांपूर्वीच रस्ते अपघातामध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला होता.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू