AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमार यांचा विषय शांत झालेला नसताना निवडणूक आयोगाचा अजून एक अधिकारी सापडला वादात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात देशभरात मोठा गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. अशावेळी निवडणूक आयोगातील अजून एक अधिकारी वादात सापडला आहे. महत्वाचं म्हणजे सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी या दोन निवडणूक आयुक्तांनीच नवीन प्रकरण समोर आणलय.

ज्ञानेश कुमार यांचा विषय शांत झालेला नसताना निवडणूक आयोगाचा अजून एक अधिकारी सापडला वादात
election commission
| Updated on: Oct 03, 2026 | 2:12 PM
Share

निवडणूक आयोगातील मतभेद समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. हा वाद अजून शांत झालेला नसतानाच आता निवडणूक आयोगातील अजून एका अधिकाऱ्याच्या कामकाजावरुन वाद समोर आलय. जुलै महिन्यात सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी या दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिव टीवी सोमनाथ यांना वेगवेगळी पत्र लिहिली व वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त मनीष गर्ग यांच्या एका निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. हिंदुस्तान टाइम्सने या संबंधी वृत्त दिलं होतं.

हा निर्णय निवडणूक आयोगाच्या आयटी महासंचालक सीमा खन्ना यांच्या फाईल्सच्या समीक्षेशी संबंधित आहे. मनीष गर्ग यांनी एक आदेश काढला व डीजी आयटीच्या फाईल्स उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार यांच्याकडे पाठवण्याची व्यवस्था बंद केली. दोन्ही निवडणूक आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “संजय कुमार एक अनुभवी अधिकारी आहेत. त्यांन निवडणूक प्रक्रियेची चांगली समज आहे. अशावेळी आयटी विभागाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यापासून त्यांना दूर ठेवणं हे नियमांचं उल्लंघन आहे”

आदेश कधी पूर्णपणे लागू झाला नाही

वाद वाढल्यानंतर मागच्या आठवड्यात निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण जारी केलं. हा विषय धोरणात्मक वाद किंवा आयटी विभागाच्या कामकाजाशी संबंधित नाहीय. आयोगात प्रतिनियुक्तीवर तैनात एका अधिकाऱ्याच्या आचरणाशी संबंधित होता. आयोगानुसार मनीष गर्ग यांचा आदेश कधी पूर्णपणे लागू झाला नाही. आयटी विभागाच्या उपनिवडणूक आयुक्तावर लक्ष ठेवण्याचं काम चालूच राहिलं.

मनीष गर्ग यांनी आदेशावर काय स्पष्टीकरण दिलं ?

ऑगस्ट महिन्यात संजय कुमार आपल्या कॅडरवर परत आले. ते गेल्यानंतर त्यांची जबाबदारी आता मनीष गर्ग संभाळत आहेत. मनीष गर्ग यांच्या माध्यमातून डीजी आयटीच्या फाईल्स निवडणूक आयुक्तांपर्यंत पोहोचत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनीष गर्ग यांनी दोन्ही निवडणूक आयुक्तांना भेटून आपली बाजू मांडली. हा निर्णय पदक्रमाशी संबंधित होता. कारण डीजी आयटी सीमा खन्ना यांना अलीकडेच प्रमोट करण्यात आलेलं. त्या उप निवडणूक आयुक्त संजय कुमार यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी होत्या.

वादावर सरकारचं म्हणणं काय?

कॅबिनेट सचिव टी.वी. सोमनाथ यांनी दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या तक्रारी कार्मिक एवं प्रशिक्षण विभागाला (DoPT) पाठवल्या. सरकारचं म्हणणं आहे की, या प्रकरणात थेट कारवाई करणं हे निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेत हस्तक्षेप करण्यासारखं आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू