लज्जास्पद! पोळी लाटताना थुंकीचा वापर, व्हिडीओ व्हायरल होताच अखेर आरोपीला अटक

उत्तर प्रदेशमधील एका हॉटेलमध्ये एका कर्मचारी पोळ्या करताना त्यावर थुंकल्याचे गंभीर प्रकरण नुकतेच समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी लखनऊ आणि मेरठ येथेही असे प्रकार घडले होते.

लज्जास्पद! पोळी लाटताना थुंकीचा वापर, व्हिडीओ व्हायरल होताच अखेर आरोपीला अटक
धक्कादायक घटना...Image Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 9:58 AM

अन्न हे पूर्णब्रह्म ! ताटात वाढलेले सगळं जेवण संपवावे, स्वयंपाक करताना प्रसन्न चित्ताने करावा, म्हणजे ते अन्न खाणा-याच्या अंगी लागते. असे अनेक लहान-मोठे सल्ले आपण लहानपणापासून ऐकत असतो. मात्र हेच अन्न तयार करताना कोणी लज्जास्पद, घृणास्पद कृत्य करत असेल तर? उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) एका हॉटेलमधील कर्मचारी पोळ्या तयार करताना त्यामध्ये थुंकत (Man spitting on Roti) असल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. बिजनौर येथील हॉटेलमध्ये अरबाज नावाचा कर्मचारी पोळ्या करताना त्यावर थुंकत असताना पकडला गेला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपी अरबाजला अटक केली आहे. नजीबाबाद जवळील जलालाबाद येथील हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी अरबाज विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी राजधानी लखनऊ आणि मेरठ येथेही असे प्रकार घडले होते.

काय आहे प्रकरण?

जलालाबाद येथे सदाबहार नावाचे हॉटेल आहे. तेथे मांसाहारी जेवण मिळते. तेथे जेवणासाठी आलेल्या एका ग्राहकाने जेव्हा हॉटेलमधील कर्मचा-याला पोळी लाटताना पाहिले, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. तो कर्मचारी पोळ्या बनवताना थुंकीचा वापर करत होता. हे पाहताच त्या ग्राहकाने तातडीने त्याचे हे कृत्य कॅमे-यात कैद केले आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला.

पोलिसांनी केली चौकशी

या घटनेची माहिती पोलिसांना तातडीने देण्यात आली असता, त्यांनी हॉटेलचा कर्मचारी अरबाज याला अटक केली. हे घृणास्पद कृत्य तो का आणि कधीपासून करत आहे, याबद्दल पोलीस अरबाजची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम 269 आणि 270 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वीही घडले आहेत असे प्रकार

पोळ्या बनवताना कर्मचा-याने थुंकीचा वापर केल्याच्या अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. गेल्या वर्षी राजधानी लखनऊ येथील काकोरी परिसरातील एका भोजनालयात असा प्रकार घडला होता. तेथील एक कर्मचारी कणकेत थुंकताना पकडला गेला होता. त्या घटनेचा व्हिडीओही खूप व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मेरठमध्येही असा प्रकार उघडकीस आला. तेथेही एका कर्मचा-या कणकेवर थुंकल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तो एका लग्नसमारंभादरम्यान असे कृत्य करताना कॅमे-यात कैद झाला होता. त्या आरोपीचे नाव नौशाद असे होते.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.