AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात पडली, अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावले मग…

पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची एक वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये न्यूड व्हिडिओ कॉलही झाले.

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात पडली, अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावले मग...
प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवलेImage Credit source: Social Media
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 02, 2023 | 3:29 PM
Share

नवी दिल्ली : सोशल मीडियावरुन होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र तरीही तरुण-तरुणी या आमिषाला बळी पडत आहेत. अशीच घटन दिल्लीत उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री करणे एका अल्पवयीन मुलीला चांगलेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवरील मित्राने मुलीला गुरुग्राममधील हॉटेलवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मग तिचे न्यूड फोटो तिच्या आईला पाठवत सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. आईच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्कोसह लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

इन्स्टाग्रामवर झाली होती मैत्री

पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची एक वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये न्यूड व्हिडिओ कॉलही झाले.

हॉटेलमध्ये भेटायला बोलावून मुलीवर अत्याचार

यानंतर आरोपीने मुलीला दोन वेळा गुरुग्राममधील हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान त्याने मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता.

आईला मुलीचे अश्लील फोटो पाठवले

आरोपीने मंगळवारी मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. तसेच तिच्या आईलाही पाठवले. याबाबत आईने मुलीकडे चौकशी केली असता मुलीने सर्व घडला प्रकार सांगितला. यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच