Pune Child Death : मित्रासोबत कालव्याजवळ खेळत होता चिमुकला, अचानक पाय घसरला अन्…

आंबेगाव घोडेगाव येथील आरव समीर झोडगे हा मित्रासोबत खेळायला गेला तो परत आलाच नाही. त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलाचा 1 जानेवारी रोजी मध्यरात्री घोडेगावजवळ डिंभे धरण उजव्या कालव्यात थेट मृतदेहच आढळून आला.

Pune Child Death : मित्रासोबत कालव्याजवळ खेळत होता चिमुकला, अचानक पाय घसरला अन्...
कालव्यात बुडून मुलाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 2:22 PM

घोडेगाव/पुणे : मित्रासोबत कालव्याजवळ खेळायला गेलेल्या सहा वर्षाच्या मुलाचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. आंबेगावमधील घोडेगाव येथे डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात पडल्याने चिमुकल्याचा कालव्यातील वाहत्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरव झोडगे असं मृत मुलाचे नाव आहे. मुलाचा मृतदेह शोधण्यास यश आले आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मित्रासोबत खेळायला गेला तो परतलाच नाही

आंबेगाव घोडेगाव येथील आरव समीर झोडगे हा मित्रासोबत खेळायला गेला तो परत आलाच नाही. त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलाचा 1 जानेवारी रोजी मध्यरात्री घोडेगावजवळ डिंभे धरण उजव्या कालव्यात थेट मृतदेहच आढळून आला.

कालव्याजवळ त्याचा शोध सुरु केला

घोडेगाव जवळील इनामवस्ती येथे सागर भास्कर यांच्या घराशेजारून गेलेल्या कालव्या जवळून आरव झोडगे हा लहान मुलगा बेपत्ता झाला. हा मुलगा कालव्याजवळ खेळत होता. याची माहिती पोलिसांना कळताच पोलीस आणि स्थानिक लोकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्याचा तपास लागू शकला नाही.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या दिवशी मध्यरात्री मृतदेह आढळला

शेवटी तो कालव्यात पडल्याचा अंदाज सर्वांना आला. यावरून कुकडी पाटबंधारे विभागाला कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर परत कालव्याच्या कडेने त्याचा शोध घेण्यात आला. 1 जानेवारी रोजी रात्री 1 च्या सुमारास त्याचा मृतदेह कालव्यामध्ये मिळून आला.

आरवचा शोध घेण्यासाठी आपदा मित्र, पोलीस तसेच घोडेगाव, चास, नारोडी येथील अनेक तरुण त्याचा शोध घेत होते. या घटनेमुळे घोडेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. झोडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.